कोकण

पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर; लोटे MIDC तील पाणीपुरवठा सुरळीत होणार

राजेश कळंबटे

दुरुस्ती हाती घेण्यात आली असून आज सायंकाळपर्यंत येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

रत्नागिरी : लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना कामासाठीचे पाणी पुरवणारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम चालू असतानाच गळती लागली आहे. तथापि दुरुस्ती पूर्वीच प्रस्तावित करण्यात आली होती. सोमवारी औद्योगिक क्षेत्रास सुट्टी असते. त्यामुळे ही दुरुस्ती हाती घेण्यात आली असून आज सायंकाळपर्यंत येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चिपळूण उपविभागा मार्फत लोटे -परशुराम औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी पुरवठा करणारी अशुद्ध जलवाहिनीचे काम वालोंपे आज सायंकाळ 6 पर्यंत सुरु होणार आहे. 1982 ला टाकण्यात आलेली जलवाहिनी कमकुवत झाली आहे. परिणामी पाईपलाईन वारंवार फुटत असल्या कारणाने तो भाग बदलने जरुरीचे होते. त्याची पूर्व कल्पना इंडस्ट्रियल असोसिएशनला दिली आहे.

कंपन्या बंद असल्यामुळे काल रात्रीपासून काम सुरु आहे. आज पाईप मोकळा करत असताना खोदाईच्या कामामुळे काही कारणाणे पाईपला गळती लागली. परंतु तो कामाचाच भाग आहे. मात्र आज सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महामंडळ उपविभाग चिपळूणच उपाभियंता यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT