Low cost farming in Bhirwande 
कोकण

कमी खर्चात शेती, भिरवंडेच्या तरुणांचा आदर्श

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) - जगावर कोरोनाचे संकट गडद असताना अनेक तरुण शेतीत नवे प्रयोग करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहेत. असाच प्रयोग भिरवंडे गावातील तरुणांनी केला असून, कमी खर्चात दीड एकरात हळद, अर्धा एकर मिरची तर पाऊन एकरात झेंडूची शेती फुलवून भावी पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. 

भिरवंडे विविध विकास सेवा सोसायटी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणांनी भाजी आणि शेतीपूरक व्यवसायात पाऊल टाकले आहे. भिरवंडे खलांतरवाडीत मुकेश सावंत, भिरवंडे परतकाम येथील नीलेश सावंत, संजय तोरस्कर आणि रामचंद्र गुरव या चौघांनी शेतीपूरक व्यवसायात टाकलेले पाऊल कमालीचे धाडसाचे ठरले आहे. भिरंवडेतील तरुणांनी संकटातही मार्ग शोधला आहेच; परंतु इतर शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसाय उभे करण्यासाठी गरज आहे ती आर्थिक पाठबळाची आणि मार्गदर्शनाची. 

भावी पिढीला आदर्श 
पाऊन एकरात दीड हजार झेंडूची रोपे जून महिन्यात लागवड केली होती. आता हा झेंडू फुलोऱ्यात आला आहे. सध्या बाजारभावाप्रमाणे 60 रुपये किलोप्रमाणे झेंडू फुले विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या तरुणांनी झेंडू शेतीसह दीड एकरांत हळद लागवड केली आहे, तर अर्ध्या एकरात मिरची लागवड केली. पावसाळी हंगामातील ही शेती तरुण वर्गाला लाभदायक ठरत आहे. कमी खर्चात छोट्या व्यवस्थापनात मनुष्यबळाच्या कमी वापरात उभारलेली ही शेती येणाऱ्या पिढीला आणि तरुणांना मार्गदर्शक ठरत आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT