कोकण

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'या' बियाणावर मिळणार अनुदान ; महा-डीबीटीवर आजच करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : महा-डीबीटी पोर्टलवर (Maha-DBT portal)शेतकरी योजना (Farmers Scheme) या सदराखाली सर्व योजनांकरीता एकाच अर्जाद्वारे लाभ देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्यही दिले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे.

Maha DBT for seeds Apply on the portal by May 15 kolhapur marathi news

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शिर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेतंर्गत लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोया, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आदी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहे. यासाठी १५ मे २०२१ पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. महा- डीबीटी पोर्टलचे http://mahadbtmail.gov.in/ या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट सामुदायिक सेवा केंद्र ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून संकेतस्थळावर अर्ज करु शकतात.तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmergmail.com या ई-मेल वर संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे. त्याशिवाय अनुदानाचे वितरण नाही.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापर कर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल, त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून योजनांसाठी अर्ज करता येईल. त्या अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये दिलेला आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा. त्याशिवाय अनुदानाचे वितरण करता येणार नाही. या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेवू शकते.

Maha DBT for seeds Apply on the portal by May 15 kolhapur marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Report Card: भारतीय संघांनी वर्षभरात जिंकल्या तीन ICC ट्रॉफी; वनडे-टी२०मध्ये वर्चस्व, पण कसोटीत घोर निराशा

Vasai Virar News : नवं वर्ष जल्लोषाला यंदा तळीरामाची पंचाईत होणार; एकादशी मुळे बार बंद!

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी पुण्याची जबाबदारी असणार सुप्रिया सुळेंकडे!

Loni Kalbhor News : अवघ्या अर्ध्या तासात ५ एकर ऊस जळून खाक; लोणी काळभोरचे ६ शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा अधिक नुकसान!

Mangalwedha Election : मंगळवेढा नगरपालिकेत क्रॉस मतदानाचा परिणाम; सुप्रिया जगतापचा पराभव; सुनंदा अवताडेला फायदा!

SCROLL FOR NEXT