mahad nadgaon land scam two more arrested 5 jailed midc police Sakal
कोकण

Mahad Crime News : जमीन गैरव्यवहारप्रकरणी आणखी दोघांना अटक; आतापर्यंत पाच ताब्‍यात, कसून शोध सुरू

नडगाव येथील जमीन व्यवहारात फसवणूक केल्‍याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मुद्रांक विक्रेता व आणखी एका व्यावसायिकाला अटक केली आहे. यामुळे अटक झालेल्यांची संख्या पाच झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

महाड : तालुक्यातील नडगाव येथील जमीन व्यवहारात फसवणूक केल्‍याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मुद्रांक विक्रेता व आणखी एका व्यावसायिकाला अटक केली आहे. यामुळे अटक झालेल्यांची संख्या पाच झाली आहे.

महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणाची तक्रार २०२२ मध्ये दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तीन व्यावसायिकांना दोन दिवसांपूर्वी अटक केली. भानजी पटेल, विश्राम पटेल आणि सचिन गुजर अशी अटक केलेल्या व्यावसायिकांची नावे आहेत.

चंद्रकांत मोरे आणि विश्राम पटेल यांच्या संयुक्त मालकीची नडगाव येथे १०८ गुंठे जागा होती. हे माहिती असतानाही मनजी भानजी पटेल आणि विश्राम पटेल यांनी बनावट अखत्यार पत्र तयार करून जागेची विक्री सचिन गुजर यांना केली.

एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये तीन व्यावसायिकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करताच त्‍यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाने जामीन फेटाळल्याने तिघांना पोलिसांनी अटक केली.

सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी

जमीन व्यवहारात फसवणूक केल्‍याप्रकरणी पाच आरोपींना माणगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस कसून तपास करीत असून अनेकांचे जबाब नोंदवले जात आहेत. त्यामुळे जमिनींची खरेदी-विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT