महाड शहर सावित्री व गांधारी नदीच्या संगमावर वसले आहे sakal
कोकण

महाड : नदीच्या पातळीनुसार महाडमध्ये वाजणार भोंगे

पूरस्‍थितीत मिळणार सावधगिरीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

महाड : भोंग्यांच्या आवाजावरून महाराष्ट्रात चांगलेच वादळ उठले आहे. भोंग्यांवर बंदी घालावी इथपासून आवाज व वेळेच्या मर्यादेपर्यंत भोंग्यांचा विषय चांगलाच गाजत राहिला. असे असले तरी यंदा नदीच्या पातळीनुसार महाडकरांसाठी सावध करणारे भोंगे महाडमध्ये वाजणार आहेत.

महाड शहर सावित्री व गांधारी नदीच्या संगमावर वसले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढली की महाड शहरामध्ये पुराचा धोका निर्माण होतो. महाड शहराला दरवर्षी पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. गतवर्षी २२ जुलैला आलेल्या महापुराने सर्व महाडकरांचे अतोनात नुकसान केले. महाड नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पूर परिस्थितीवर विशेष लक्ष दिले जात असून त्यामुळे आता महाडमध्ये भोंगे वाजणार आहेत. शहरामध्ये पुराच्या पाण्याच्या पातळीचा म्हणजेच पुराच्या धोक्याचा इशारा देण्यासाठी नगर परिषदेमार्फत तीन ठिकाणी भोंगे बसविण्यात आले आहेत. भोंग्यांचा कालावधी आणि संख्येवरून नागरिकांना पुराचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे. महाड नगरपालिकेचे नवीन प्रशासकीय भवन, जुने कार्यालय व नेवनगर पोलिस वसाहत या ठिकाणी हे भोंगे बसवले जाणार असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली.

असे वाजणार भोंगे

सावित्री नदीच्या पाण्याची पातळी पाच मीटर झाली की भोंगा एकदा २ मिनिटे वाजेल. पाण्याची पातळी साडेसहा मीटर व त्यावर गेली की भोंगा दोन वेळा २ मिनिटांसाठी वाजेल. यानंतर पाण्याची पातळी साडेसात मीटर व त्यावर आणि साडेआठ मीटर व त्यावर गेली की भोंगा दोन वेळा २ मिनिटे वाजेल; परंतु पाण्याची पातळी नऊ मीटर व त्यापुढे प्रत्येक मीटर वाढत गेला की भोंगा तीन मिनिटे तीन वेळा वाजवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT