Crime esakal
कोकण

धक्कादायक ! प्रियकर दुसऱ्या मुलीशी बोलतो म्हणून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रियकर अन्य मुलीशी बोलतो या रागातून सावंतवाडी तालुक्यातील एका तरुणीने आज सकाळी तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जागृत नागरिकांनी तिची समजूत काढत तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.

सकाळ डिजिटल टीम

Crime News: प्रियकर अन्य मुलीशी बोलतो या रागातून सावंतवाडी तालुक्यातील एका तरुणीने आज सकाळी तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जागृत नागरिकांनी तिची समजूत काढत तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.

संबंधित तरुणीचे एका तरुणाशी प्रेम संबंध जुळले होते. त्यांचा लग्न करण्याचा विचार होता. मात्र, तिचा प्रियकर अन्य एका तरुणीशी मोबाईलवर बोलतो, असे तिला आज तिच्या मैत्रिणीकडून समजले. या रागातून तिने प्रियकराला तलावाकाठी बोलावून जाब विचारला. मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली. शाब्दिक बाचाबाचीनंतर राग अनावर झाल्याने तिने मोती तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे आलेल्या नागरिकांनी तिची समजून काढत तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. शिवाय याबाबत पोलिसांना कल्पना दिली.

घटनास्थळी तत्काळ पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी दाखल झाले. तत्पूर्वी प्रियकर घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले व संबंधित युवतीच्या आई-वडिलांसह प्रियकरालाही बोलावून घेतले व दोघांनाही समज दिली. यावेळी प्रियकराने संबंधित तरुणीशी लग्न करणार असल्याचे कबूल केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT