Thirty thousand works from Rohio." 
कोकण

"रोहयो'तून 30 हजार कामे  पुर्ण

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदूर्ग) :  जिल्ह्यात 2010-11 ते 2019-20 या दहा वर्षांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात 20 हजार 194 कामे पूर्ण झाली आहेत. 10 हजार 536 कामे सुरू आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी दिली. 

केंद्राने देशातील ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला रोज काम मिळावे, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली होती. या योजनेत 60/40 असा रेशो ठरविण्यात आला आहे. एखाद्या कामाला येणाऱ्या खर्चाच्या 60 टक्के खर्च हा अकुशल कामासाठी म्हणजेच मजुरीसाठी खर्च केला जातो. तर 40 टक्के खर्च हा कुशल कामावर खर्च केला जातो. यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली काम करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून रोजगार हमीची कामे केली जातात. 

 ग्रामपंचायतच्या माध्यमातून 20 हजार 194 कामे पूर्ण 

जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून नवीन वैयक्तीक विहीर, संरक्षक भिंत, गुरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड, शेळी-मेंढी शेड, प्रधानमंत्री व राजीव गांधी आवास योजनेतील मंजूर घरांचा पाया खोदाई, बंधारे बांधणे, रस्ते, गांडूळ खत प्रकल्प, फळबाग लागवड, बांबू लागवड, शौचालय, शोषखड्डे आदी कामे घेतली जातात. 2010-11 पासून 30 हजार 730 कामांना मंजुरी जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत देण्यात आली होती. त्यातील 20 हजार 194 कामे पूर्ण झाली आहेत. 10 हजार 536 कामे सुरू आहेत. 


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 
2010-11 ते 2019-20 पर्यंतच्या कामांचा तक्ता 

*तालुका * एकूण मंजूर कामे * पूर्ण झालेली कामे * सुरू असलेली कामे 

* देवगड * 3240 * 1619* 1621 
*दोडामार्ग*1941* 1251*690 
*कणकवली*4238*2506*1732 
*कुडाळ*4884*3264*1620 
*मालवण*8981*6869*2049 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

महागड्या फेरारीतही हार्दिक ऐकतो 'हा' मंत्र; म्हणाला - "याहून पॉझिटिव्ह काहीच नाही!" पाहा Viral Video

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

Pune News : भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी ‘अंनिस’ पोलिसांना देणार

SCROLL FOR NEXT