Mahatma Phule Arogya Yojana Mahatma Phule Arogya Yojana
कोकण

Mahatma Phule Arogya Yojana : तब्बल 16 लाख नागरिकांना मोफत उपचार; केशरी, पिवळ्यासह पांढऱ्या रेशनकार्ड धारकालाही मिळणार लाभ

पांढऱ्या रेशनकार्डधारकांनाही मात्र आपले रेशनकार्ड ऑनलाइन करून घ्यावे लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा (Mahatma Phule Jan Arogya Yojana) लाभ आता सर्व रेशनकार्डधारकांनाच (Ration Card) मिळणार आहे. शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कोणतीच मर्यादा ठेवलेली नाही. त्यामुळे १ जुलैपासून या योजनेअंतर्गत अंतर्भूत असलेल्या खासगी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत.

आता या योजनेचा लाभ जिल्ह्यातील एकूण ४ लाख २६ हजार ५९९ रेशनकार्डवरील १६ लाख ६१ हजार ५६२ नागरिकांना मिळणार आहे. पांढऱ्या रेशनकार्डधारकांनाही मात्र आपले रेशनकार्ड ऑनलाइन करून घ्यावे लागणार आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार (Treatment) मोफत होत होते; मात्र, त्यात २०१९ मध्ये सुधारणा करण्यात आली.

त्यानुसार ही योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अशा एकत्रित योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळू लागले आहेतच; पण आता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. यात हृदयाचे आजार, कर्करोगविषयक शस्त्रक्रिया, हाडांच्या शस्त्रक्रिया, मेंदूविषयक आदी आजारांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया मोफत होणार आहे.

उपचार किंवा शस्त्रक्रियांचा पाच लाखांपर्यंतचा खर्च शासन करणार आहे. यात ३३ विशेष रोगांकरिता कॅशलेस उपचार आणि शस्त्रक्रिया उपचार मोफत होणार आहेत. यात उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आली आहे. पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्डधारक यांनाही या योजनांचे लाभ मिळणार आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचारांचा लाभ आता सर्वच नागरिकांना मिळणार आहे. त्यासाठी सर्वच रेशनकार्डधारकांनी आपले रेशनकार्ड लवकरात लवकर ऑनलाइन करावे.

-डॉ. रेणुका चौघुले, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना, रत्नागिरी

दृष्टिक्षेपात

  • महात्मा फुले जनआरोग्य योजना

  • प्रधानमंत्री जनआरोग्य योजना

  • ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

  • शासकीयबरोबर १२ खासगी रुग्णालयांचा समावेश

ऑनलाइन कार्ड होणे गरजेचे

मोफत उपचारासाठी रेशनकार्डावरील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डला लिंक केल्यानंतर १२ आकडी नंबर मिळतो. अशा ऑनलाइन झालेल्या कार्डधारकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही प्रक्रिया त्यातील सर्वांत महत्त्वाची असल्याने त्यासाठी आता लोकांनी धावाधाव सुरू केली आहे. त्यासाठीही सेतूमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील कार्डधारक लाभार्थी

प्रकार रेशन कार्ड लाभार्थी

  • अंत्योदय ३८,८५० १,३३,८६६

  • प्राधान्य (केशरी) ४४,८१४ १,६२,२३१

  • एपीएल (केशरी) ९९,००२ ३,६८,७४०

  • एपीएल (पांढरे) २,४४,२८९ ९,९६,६६५

  • एकूण ४२६९५५ १६,६१,५०२

...या रुग्णालयात मोफत उपचार

जिल्हा शासकीय रुग्णालय, कामथे, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय या सरकारी रुग्णालयांबरोबरच वालावलकर रुग्णालय डेरवण, रामनाथ हॉस्पिटल रत्नागिरी, परकार हॉस्पिटल, घरडा हॉस्पिटल, लाइफकेअर हॉस्पिटल चिपळूण, अपरांत हॉस्पिटल चिपळूण, एसएमएस हॉस्पिटल चिपळूण या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT