Mahavikas Aghadi wants the post of Vice President in Chiplun Municipality 
कोकण

चिपळूण पालिकेत उपनराध्यक्षपद हवे महाविकास आघाडीला 

सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी ) - पालिकेतील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष पदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाचे उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्यावर अविश्‍वास दाखल करण्यासाठी विशेष सभेची मागणी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. 

याबाबतचे निवेदन नगराध्यक्षांना देण्यात आले. काही दिवसांपूर्वीच नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या 22 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे वादग्रस्त 19 मुद्‌द्‌यांबाबत तक्रार केली आहे. याविषयी सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे तर नगराध्यक्षा खेराडे यांनी या प्रकरणी थेट उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आता महाविकास आघाडीने उपनगराध्यक्ष भोजने यांना पदावरून खेचण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. त्यासाठी नगरपरिषदेची विशेष सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. येत्या दहा दिवसात नगराध्यक्षांनी ही विशेष सभा बोलवावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार ही सभा झाल्यास त्यामध्ये उपनगराध्यक्ष भोजने यांच्याविरूद्ध कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेतर्फे अविश्‍वास ठराव मांडला जाणार आहे. उपनगराध्यक्षांवरील अविश्‍वास ठराव पारित होण्यासाठी एकूण दोन तृतीयांश मतांची आवश्‍यकता आहे. महाविकास आघाडीचे 22 नगरसेवक असल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षा खेराडे दहा दिवसात विशेष सभा घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

भाजपचे फक्त 5 नगरसेवक 
सध्याच्या स्थितीत नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4, शिवसेनेचे 11 व कॉंग्रेसचे 5 आणि 2 अपक्ष असे एकूण 22 नगरसेवकांची मोट महाविकास आघाडी म्हणून बांधण्यात आली आहे. भाजपचे फक्त 5 नगरसेवक असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT