कोकण

आदिवासींसाठी स्वतंत्र कॉलम करावा; बिरसा फायटर्सची मागणी

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) :अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख करू नये, अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा (National President of Birsa Fighters Sushilkumar Pavara) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.(make-a-separate-column-for-tribals-demand-for-birsa-fighters-ratnagiri-marathi-news)

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या १२ जानेवारी २००० रोजीच्या शासन परिपत्रकानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थांच्या जातीच्या दाखल्यामध्ये फक्त जातीचा उल्लेख करावा, धर्माचा उल्लेख करण्यात येऊ नये. जून महिन्यात शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू आहे. अनेक पालक व विद्यार्थी आपल्या सोयीनुसार नवीन प्रवेशासाठी नोंदणी करत आहेत व प्रवेश घेत आहेत. त्यासाठी जातीचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला लागतो.

आदिवासी विकास विभाग राज्य यांच्या परिपत्रकानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर जातीच्या पुढे कोणत्याही धर्माचा उल्लेख न करता दाखला देण्यात यावा, तशी नोंद करावी, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय जनगणनेत आदिवासींचे अस्तित्व दाबण्यात आले. म्हणून २०२१ च्या जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र कॉलम करण्यात यावा, अशी मागणी आम्ही राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे केलेली आहे. म्हणून शासन परिपत्रकानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख करू नये, अशी मागणी सुशीलकुमार पावरा यांनी शासनाकडे केली आहे.

आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व

आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. पूर्वीपासून तो निसर्गाशी संबंधित घटकांची पूजा करत आला आहे व आतासुद्धा करत आहे. वाघदेव, बापदेव, डोंगर्‍यादेव, जल, जंगल, जमीन, वृक्ष, प्राणी इत्यादी निसर्गाशी संबंधित घटकांची आदिवासींमध्ये पूजा केली जाते. आदिवासी संस्कृती ही विशिष्ट संस्कृती आहे. आदिवासी संस्कृती कुठल्याही धर्माशी मिळतीजुळती नाही. आदिवासींची एक स्वतंत्र संस्कृती आहे. इंग्रजांच्या काळात आदिवासींना ओबाजिनिझ, अ‍ॅनामिस, ट्रायबल म्हणून ओळखले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT