malgund beach car drive accident in ratnagiri 
कोकण

अतिउत्साहीपणा आला अंगलट ; चारचाकी गाडी फसली वाळुत, काढताना फुटला घाम

राजेश कळंबटे

रत्नागिरी : पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट आल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील मालगुंड समुद्र किनारी घडली. मालगुंड समुद्र किनाऱ्यावर चारचाकी नेण्याचा प्रयत्न पर्यटकांच्या चांगलाच नडला. मालगुंड समुद्र किनारी वाळूत चारचाकी गाडी फसली आणि गाडी बाहेर काढताना पुरती दमछाक उडाली. कोरोना मुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला होता. मात्र कोरोनाची भीती कमी होऊ लागल्यामुळे पर्यटक कोकणाकडे वळू लागले आहेत.  

बहुतांशी पर्यटक खासगी गाड्या घेऊन येत आहेत. गणपतीपुळे, हर्णे सहकिनारी भागात त्यांचा राबता वाढला आहे. यामध्ये सर्वाधिक तरुणांनाच सहभाग अधिक आहे. लॉकडाउनमुळे घरात अडकून पडलेल्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी कोकणचे किनारे खुणावत आहेत. मात्र फिरण्याच्या नादात अतिउत्साह या पर्यटकांना अडचणीत आणत आहे. रत्नागिरीत समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांच्या अतिउत्साहीपणाचा फटका बसल्याच्या अनेक घटना ताज्या असताना गुरुवारी याचा पुन्हा अनुभव आला. 

सांगली येथून गणपतीपुळे येथे चारचाकी वाहनातून पर्यटक आले होते. परिसर फिरण्यासाठी हे पर्यटक मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर पोचले. या पर्यटकांनी किनाऱ्यावर वाळूत गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता गाडी वाळूत फसली. गाडी एक फुटापर्यंत वाळूत फसली आणि अखेर स्थानिकांनी प्रयत्न करून गाडी बाहेर काढली. 

वाळूमध्ये गाडी अडकल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या होत्या. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी किनाऱ्यावर गस्तीच नियोजन केले होते. कोरोनामुळे हे सगळेच थांबले. भविष्यात पर्यटक वाढणार असल्यामुळे पुन्हा किनारी भागात सतर्कता बाळगावी लागणार आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनचालकांची गैरसोय; नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT