श्रावणबाळाचे तळे sakal
कोकण

मालवण : श्रावणमधील प्रथा पिढ्यान्‌पिढ्या पाळला जातोय नियम

सिंधुदुर्गात अनेक प्रथा परंपरा धार्मिकतेशी जोडल्या आहेत.

- प्रशांत हिंदळेकर

मालवण: सिंधुदुर्गात अनेक प्रथा परंपरा धार्मिकतेशी जोडल्या आहेत. यातून अनेक गावे वैशिष्ट्ये पिढ्यान्‌पिढ्या जपत आहेत. श्रावण-तळीवाडी हे असेच एक गाव. तिन्हीसांजेनंतर तिथे रडायला मनाई आहे. हे गाव अनेक पिढ्या पूर्ण शाकाहारी, दारुपासून पूर्ण दूर आहे.श्रद्धा, अंधश्रद्धा या द्वंदात हार जीत नसते; असते ती फक्त भावभावनाबरोबरच वैचारिक बैठक आणि या बैठकीतून पुन्हा एकदा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होतो.

सर्व कच्च्या प्रश्‍नांची उत्तरे तपासली जातात. त्यातच तो गुरफुटून जातो. दिवसामागून दिवस सरले. वर्षामागून वर्षे उलटली मात्र आजही श्रावण-तळीवाडी गावात कितीही करुण प्रसंग आला तरी कुणी रडत नाही. कुणीही आरडाओरड करत नाही आणि केलाच तर त्याला श्री देव क्षेत्रपालच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशी येथे श्रद्धा आहे. पिढ्यान्‌पिढ्या असेच घडत आहे. मालवणपासून २२ किलोमीटर अंतरावर असणारे श्रावण-तळीवाडी हे गाव. यात सत्ता आणि हुकुमत चालते ती फक्त आणि फक्त गावचे प्रमुख दैवत श्री देव क्षेत्रपालाची. त्याच्या मर्जीविना या गावात साधं पानही हलत नाही, अशी श्रध्दा येथे गावकरी पिढ्यान्‌पिढ्या मानत आले आहेत. खरं तर सूर्य मावळतीकडे झुकला की या श्रावण-तळीवाडीमध्ये कुणी रडत नाही. गाव विविध वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. येथे पुरातन असे पांडवकालीन गणेश मंदिर असून बाजूलाच एक गुहा आहे.

या गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपाल आहे. या गावाचा अधिकारी म्हणून श्री देव क्षेत्रपालाकडे पाहिले जाते. चारही बाजूंना डोंगर आणि डोंगराच्या कुशीत असलेले क्षेत्रपालाचे मंदिर मोहित करते. क्षेत्रपाल मंदिराच्या आजूबाजूला शेतजमीनीतून वाट काढत आणि अलीकडच्या काळात बांधलेल्या दगडी पाखाडीने या मंदिरात जावे लागते. मंदिरात शिवपिंडीच्या रूपाने क्षेत्रपालाचे अस्तित्त्व असून मंदिरात काही विरगळ आणि बारापाचाची पाषाणे आहेत.

श्रावणबाळाचे तळे

श्रावण तळीवाडी भागातील या मंदिराच्या बाजूलाच पाण्याचे एक तळे आहे. हे तळे पुराण कथेतील श्रावण बाळाचे तळे म्हणून ओळखले जाते. पुराणकाळातील श्रावण बाळाची गोष्ट याचठिकाणी घडली अशी आख्यायिकाही असल्याचे या भागातील स्थानिक जाणकार सांगतात. या तळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुसळधार पाऊस पडला किंवा महापूर आला तरी हे तळे दुथडी भरून वाहत नाही; मात्र उन्हाळ्यात, पावसाळा संपला की जसजसा उन्हाळा सुरू होतो तसतसा या तळ्याचे पाणी दुथडी भरून वाहू लागते. या तळ्याच्या पाण्याची चवही या भागातील विहिरींच्या पाण्यापेक्षा वेगळीच आहे. या तळ्याच्या पाण्यात जर एखाद्याने भात शिजविला तर त्या भाताचा रंग रक्तासारखा लालेलाल होतो, असे स्थानिक सांगतात. त्यामुळे या तळ्याच्या पाण्याचा उपयोग जेवणासाठी होत नाही; मात्र या तळ्याचे पाणी पिण्यास वापरतात. या तळ्याच्या पाण्यावरच तेथील शेती व भाजीपाला पिकतो.

श्रावण गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहासात याबाबतच्या ठळक नोंदीही आहेत. तळीवाडी भागात तिन्हीसांजेच्या वेळी कोणीही रडत नाही. हे या वाडीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. पिढ्यान्‌पिढ्या ही प्रथा स्थानिकांनी जोपासली आहे आणि यापुढेही ती अविरतपणे जोपासणार आहोत.

- कमलाकांत कुबल, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिंदेंच्या आमदाराचा फुकटचा राडा, कँटिन नाहक बदनाम; अन्न आणि औषध प्रशासनाकडून क्लीन चीट

Nandwal Dance Party Clash : करवीर तालुक्यात पार्टीदरम्यान नृत्यांगना नाचवल्याने गावात खळबळ; तरुणांमध्ये वादावादी, पोलिसांचा हस्तक्षेप

Diwali Recharge Offer : दिवाळी स्पेशल 1 रुपयचा रिचार्ज! रोज 2GB डेटा, कॉलिंग, SMS अन् महिन्याची वैधता, बड्या कंपनीने आणली धमाका ऑफर

Pune News : पुण्यात मुख्यमंत्री, संरक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी साप; उपस्थितांचा उडाला गोंधळ

संकर्षण कऱ्हाडेंनी घेतली नितिन गडकरी यांची भेट, भेटीदरम्यान मिळाली खास भेट, अभिनेता म्हणाला...

SCROLL FOR NEXT