gauri pujan sakal
कोकण

ये गं गौराबाई...! मंडणगडात पारंपरिक गाण्यांचे सूर

मंडणगडात पारंपरिक गाण्यांचे सूर; महिलांच्या उत्साहाला उधाण; दोन दिवस रात्रीचा जागर घुमणार

सचिन माळी.

मंडणगड : पिवळे पिवळे ठसे, गौराईला माहेर दिसे...अशी पारंपरिक गाणी गात, गौरीला सुबक साडी नेसवून पावसाच्या संततधारेत सासुरवाशिणी डोक्यावरून मोठय़ा आनंदाने माहेरी घेऊन येत गणपतीच्या बाजूला स्थानापन्न करण्यात आले. निसर्गातील हिरव्या चादरीचे रुपांतर सोनेरी रंगात बदलण्यास सुरवात होते. यामुळे धन-धान्याची आरास असल्याने गौराई सोन्याच्या, मोत्याच्या पावलांनी घरात प्रवेश करीत असल्याचे मानले जाते. महिलांच्या उत्साहाला उधाण आले असून दोन रात्री झिम्मा, फुगडी, कोंबडा, सूप नाचवणे अशा विविध पारंपरिक नृत्य प्रकाराने गौरीचे जागरण होणार आहे. आजही तालुक्यात हा सुंदर सोहळा पहावयास मिळतो.

आपल्या घरी आलेल्या माहेरवाशिणीचे रुसवे, फुगवे, लाड पुरविण्याचा सण म्हणजे गौरी-गणपतीचा सण. बाप्पाचे आगमन होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटून गेलाय. आज ज्येष्ठा गौरीचे सर्वत्र मोठय़ा उत्साहात आगमन झाले.

सकाळी मंडणगड बाजारपेठेत गौरी पूजनासाठी लागणाऱ्या सूप, फळे, फुले वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाप्पांच्या आगमनानंतर उत्सवातील महत्त्वाचा सण म्हणजे ज्येष्ठा गौरींचे आगमन व पूजन. भाद्रपदातील ज्येष्ठा-कनिष्ठा गौर ही माहेरवाशीण म्हणून ओळखली जाते. शिवप्रिया पार्वती ही गौरीच्या रुपाने अवतरत असल्याने शिवारात समृद्धी असते. निसर्ग पानाफुलांनी बहरलेला आहे. संध्याकाळच्या मुहूर्तावर महिलावर्ग वेशिवरील मंदिराकडे गेल्या. गुलाबी रंगाने बहरलेला चिरडा जमा करण्यात आला.

सारवण करून त्याठिकाणी यथोचित पूजा करण्यात आली. त्यानंतर सोबत आणलेला गौरीचा मुखवटा गोळा केलेल्या चिरड्याच्या टोकाला बांधून दिला साडी नेसवण्यात आली. वस्त्र, अलंकारांनी मनाजोगी सजवल्यानंतर वाजतगाजत गौराईला घेवून महिलावर्ग घराकडे आला. घराच्या उंबरठय़ापाशीच माप ओलांडून संपूर्ण घरात फिरवल्यावर गौराईला स्थानापन्न करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी तिचा साजशृंगार करण्यात आला. यावेळी आरास, विविध प्रकारची धान्य, पत्री, फुले व अत्तर, अलंकारांनी सजवून, नटवल्यामुळे गौराईचे सौंदर्य नखशिखांत बावन्नकशी दिसत होते. दोन दिवस रात्रीचा जागर घुमतो. माहेरवाशिणीचे रुसवे-फुगवे, लाडाची सरबत्ती सुरु होते. जाखडी नृत्य, झिम्मा, फुगडी, फेर धरुन नाच-दंगा, आसू आणि हसू रात्र जागवून गौराईचं जल्लोषानं स्वागत होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT