Mandangad Nagar Panchayat election Esakal
कोकण

मंडणगड नगरपंचायत; यंत्रातील आकडे उलगडणार 44 उमेदवारांचे भविष्य

१७ जागांचे निकाल; चार प्रभागात 85.36 टक्के मतदान

सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी): आबोसी आरक्षणाचे (OBC Reservation) प्रश्नांमुळे रद्द झालेल्या मंडणगड नगर पंचायतीमधील (Mandangad Nagar Panchayat election)4 प्रभागांचे सार्वत्रिक निवडणुकांसाठी ता. 18 जानेवारी रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुलमध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. त्यासाठी 85.36 टक्के मतदान झाले असून, उद्या एकूण १७ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. मतदान यंत्रातील आकडे 44 उमेदवारांचे भविष्य उलगडणार असून कोकणातील राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागून राहिले आहे.

दिवसाखेर 85.36 टक्के इतके मतदान झाले. यामध्ये 277 पुरुष, 289 महिला असा एकूण 566 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंडणगड नगरपंचायतीचे 17 पैकी शिल्लक 4 प्रभागात एकुण 663 मतदार आहेत. यात 323 पुरुष व 340 स्त्री मतदारांचा समावेश आहे. सकाळी 7.30 ते 11.30 या चार तासांच्या दोन सत्रात 52.18 टक्के इतके मतदान झाले. यात 170 पुरुष 176 महिला अशा एकूण 346 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. निवडणुक प्रचारात दोन्ही आघाड्यांनी घेतलेली आघाडी लक्षात घेता या प्रभागातील मतदानाची सरासरी टक्का वाढला आहे. चार प्रभाग सत्ताकारणाची गणिते स्पष्ट करणारे असल्याने अधिकाधीक मतदारांना आकर्षित करण्याकडे दोन्ही आघाड्यांचा कल दिसून आला. मतदान प्रक्रीया शांततेत संपन्न होण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रातांधिकारी खेड भाग्यश्री मोरे, तहसिलदार नारायण वेगुर्लेकर, निवासी नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे, पोलीस निरिक्षक उत्तम पिठे, शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चुरस वाढल्याने निकालाची उत्कंठा

राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडी व विरुध्द सेनेच्या बंडखोरांची शहर विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये शिल्लक चार प्रभागांमध्येही मोठी चुरस निर्माण झाली. दोन्ही बाजूना आम्हीच सत्तेत येणार व सत्तेच्या जवळ आलेलो असल्याचा विश्वास व्यक्त होत असल्याने चार प्रभागात आधिकाधीक जागा निवडुन आणण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रचारात चुरस निर्माण केली. मतदानाच्या दिवशी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे उमेदवारांचे बुथवर जमलेली गर्दी त्याची साक्ष देत होती. एकंदरीत सत्ताकारणीच चावी चार प्रभागांमधून जात असल्याने मोठा उत्साह व चुरस दिसून आली.

महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास

मतदान संपता संपता महाआघाडीच्या वतीने पत्रकारांना संबोधीत करताना माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) व माजी आमदार सुर्यकांत दळवी (Suryakant Dalvi )यांनी महाआघाडीचा विजयाचा विश्वास व्यक्त केला. महाआघाडीची घोषणा झाल्यापासून विरोध उरला नसून, विजयाची औपचारीकता राहीली आहे. दोन्ही पक्ष शहराचा दुप्पटीने विकास करतील अशी प्रतिक्रिया दोन्ही माजी आमदारांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT