In Mandangad taluka rain for two days Rivers streams flowing Farms 
कोकण

मृगाच्या सरींची मंडणगडला कोसळधार ; शेत शिवार पाण्याने भरली तुडुंब

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड  (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यात दोन दिवस मृगाच्या सरींची कोसळधार झाली. मृग नक्षत्रात एवढा मुसळधार पाऊस तालुक्याने अनेक वर्षांनी अनुभवला. दिवसभर पाऊस कायम राहिल्याने हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला असून शेत शिवार पाण्याने तुडुंब भरली. तालुक्यातील नदी, नाले, ओढे या पावसात प्रवाहित झाल्याने वाहत्या पाण्याचा आवाज होवू लागला आहे. शुक्रवारी पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांना पुन्हा वेग आला.


 १९ जून रोजी तालुक्यातील मंडणगड 105 मिमी, देव्हारे 110 मिमी, म्हाप्रळ 115 मिमी असा तीन मोजणी केंद्रात एकूण 320 मिमी पाऊस पडला. 19 जून रोजी दिवसभरात तालुक्यात सरासरी 106 मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण 550 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. नदी, नाले, ओढे प्रवाहित झाले असून जलस्रोतांच्या मुखातून पाणी वाहू लागले आहे. विहिरी तुडुंब भरल्या.

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारली होती. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर सुमारे पाच हेक्टरवर भात पेरण्या पूर्ण झाल्या. चार दिवसांपूर्वी पावसाने रिपरिप सुरू केल्याने उगवण झालेली रोपे तरारली. बैलजोड्यांची कमतरता असल्याने यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी पॉवर टिलर व ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे पूर्ण केली. सध्या भातवाढीसाठी पोषक वातावरण असल्याने आगामी काळात भात लावणीची कामे करण्यावर शेतकऱ्यांचा भर असणार आहे.

आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यातील भारजा, निवळी नद्या, गावोगावचे ओढे, नालेही पाण्याने भरून वाहू लागले आहेत. मंडणगड बाणकोट, म्हाप्रल अशा अनेक मार्गावर रस्त्यात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्यात पाणी साचल्याने खड्डा दिसून येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT