Mangalsutra Theft Arrested In 12 Hours By Local Crime Investigation
Mangalsutra Theft Arrested In 12 Hours By Local Crime Investigation  
कोकण

मंगळसुत्र पळवणारा 12 तासात गजाआड;  स्थानिक गुन्हे अन्वेषणची कामगिरी 

सकाळवृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - माणगाव येथील साटम दाम्पत्य भात कापणीसाठी शेतात गेल्याने बंद असलेल्या घरात सोन्याच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 12 तासाच्या आत मुसक्‍या आवळल्या. आनंद महादेव चीपकर (रा. तळीवाडी माणगाव) असे संशयिताने नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 99 हजार रूपयांचे चार पदरी सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे. 

तालुक्‍यात माणगाव तळीवाडी येथील साटम दाम्पत्य 4 ऑक्‍टोबरला सकाळी 9 ते दुपारी 2 च्या सुमारास आपल्या शेतात भात कापणीसाठी गेले होते. दरम्यान याच कालावधीत घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोराने साटम यांच्या घराच्या दर्शनी भागातील दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातील कपाटात असलेले 99 हजार रुपये किमतीचे चार पदरी सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले होते. साटम दाम्पत्य घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला होता. 

याबाबत पार्वती महादेव साटम (वय 50, रा. तळीवाडी माणगाव) यांनी कुडाळ पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीसात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला होता. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमले होते. 

या पथकाने तपास काम सुरू केले असता त्यांना माणगाव तळीवाडी येथील आनंद महादेव चिपकर याचा या चोरीत समावेश असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे चिपकर याला ताब्यात घेवून या पथकाने चौकशी केली असता चिपकर याने चोरी केली असल्याची कबुली दिली. संशयिताकडून चोरीला गेलेले मंगळसूत्र आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला हातोडा हस्तगत केला आहे. 

तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार रामचंद्र शेळके, आशिष गंगावणे, कृष्णा केसरकर, सत्यजित पाटील, रवी इंगळे, संदीप नार्वेकर यांचा सहभाग होता. गुन्हा घडल्यापासून 12 तासाच्या आत चोराच्या मुसक्‍या आवळन्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उल्लेखनीय नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिक्षकांकडून या पथकाचे अभिनंदन केले आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT