konkan  esakal
कोकण

'स्टंटबाजी कशी करावी? हे राणेंकडून शिकावे'

आता हे काम सुरू होणार हे समजल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्याचा स्टंट केला आहे.

एकनाथ पवार

या प्रक्रियेत आमदार राणे हे कुठेही नव्हते; परंतु आता हे काम सुरू होणार हे समजल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्याचा स्टंट केला आहे.

वैभववाडी : उंबर्डे-फोंडा रस्ता मंजुरीसाठी सतत पाठपुरावा केल्यानंतर पालकमंत्री आणि खासदारांनी या रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी बांधकाम विभागाकडून निधी मंजुर करून दिला. कोरोनामुळे या कामाला स्थगिती होती. ती उठवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; परंतु कोणताही पाठपुरावा न करता आमदार नितेश राणे यांनी या कामाच्या नुतनीकरणाचा शुभारंभ केला. स्टंटबाजी कशी करावी? हे त्यांच्याकडून शिकावे, अशी टीका शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.

उंबर्डे-फोंडा रस्त्याच्या नुतनीकरणाचा शुभारंभ आमदार राणे यांनी केला होता. त्या पार्श्वभुमीवर लोके यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उंबर्डे-फोंडा रस्त्याचे नुतनीकरण व्हावे म्हणून मी सातत्याने तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनीही बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा करून दोन वर्षापुर्वी या रस्ता कामाच्या नुतनीकरणासाठी निधी मिळवुन दिला; परंतु प्रत्यक्षात काम सुरू होण्यापुर्वी कोरोनामुळे त्या कामाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर या कामाची स्थगिती उठवून काम व्हावे, यासाठी पालकमंत्री सामंत, खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले. या प्रक्रियेत आमदार राणे हे कुठेही नव्हते; परंतु आता हे काम सुरू होणार हे समजल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्याचा स्टंट केला आहे.

काम तातडीने करावे असे ते अधिकाऱ्यांना सांगत आहेत; परंतु प्रत्यक्षात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे भरल्याशिवाय हे काम केले तर त्याचा दर्जा राहणार नाही. या रस्त्याचा संपुर्ण भाग उखडला गेला आहे. याशिवाय दोन वर्षापूर्वी त्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे जोपर्यत रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यत या रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT