mango export from foreign country for this year see transport in ratnagiri 
कोकण

यंंदा परदेशात समुद्रमार्गे हापूसची निर्यात; 16 टन आंबा होणार रवाना

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : आखाती देशांमध्ये रत्नागिरीच्या हापूसला मोठी मागणी आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी रत्नागिरीतून जलवाहतुकीने हापूस निर्यात करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. वातानुकूलित कंटेनरमधून पहिल्या टप्प्यात १६ टन हापूस रत्नागिरीमधून जेएनपीटी बंदरमार्गे जलवाहतुकीने नेण्यात 
येणार आहे. एका कंटेनरमध्ये साडेपाच हजार बॉक्‍स म्हणजेच सरासरी १६ टन आंबा एकाचवेळी पाठविता येईल. कंटेनर रत्नागिरीत आणून येथील निर्यात व प्रक्रिया केंद्रात आंबा वॉशिंग, ब्रशिंग केला जाईल. प्रतवारी करून तो निर्यातीसाठी आवश्‍यक पद्धतीने बॉक्‍समध्ये भरला जाईल.

वातानुकूलित कंटेनरमधील तापमान १८ अंश सेल्सिअस इतके ठेवले जाते. त्यासाठी आवश्‍यक जाड पुठ्ठ्याचे बॉक्‍स बनविण्यात आले आहेत. रत्नागिरीतून कंटेनर जेएनपीटीला व तेथून जहाजातून दुबईला रवाना होईल. यंदा प्रथमच या पद्धतीने हापूसची निर्यात होणार आहे. या पद्धतीने आंबा गेला तर आखातामधून हापूसची मागणी वाढेल. दुबईमधून ५०० टन हापूसची मागणी निर्यात केंद्र चालविणाऱ्या सद्‌गुरू एंटरप्राइजला प्राप्त झाली आहे. रत्नागिरीतील शेतकऱ्यांकडून मालाची जागेवर जाऊन खरेदी केली जाते. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो आणि रोख पैसे बागायतदारांना मिळतात. सध्या निर्यातीसाठी आवश्‍यक आंबा डझनाला ७५० ते ८०० रुपये दराने विकत घेण्यात येत आहे. 

विमान वाहतुकीचे दर चढे

गल्फ, सिंगापूर, हाँगकाँग, स्वित्झर्लंड, कॅनडा, लंडन, अमेरिकेत हापूसला मागणी आहे. फेब्रुवारी अखेरपासून हापूसची विमानाने आणि समुद्रमार्गाने निर्यात होते. कोरोनाचे सावट असल्याने अनेक देशांतील विमानसेवा सुरळीत नाही. काही ठिकाणी मालवाहतूक विमानाचा उपयोग केला जातो. पॅसेंजर विमानातून आंबा गेला तर त्याचा खर्च कमी होतो. पॅसेंजर विमानातून किलोला ६० ते ६५ रुपये, तर स्पेशल कार्गोतून किलोला १२० ते १३० रुपये खर्च येतो. त्याचा फटका निर्यातदाराला बसत आहे.

"बागायतदारांकडून थेट आंबा विकत घेतला जात आहे. त्यामुळे आखातामधून थेट विक्रीला चालना मिळेल. मागणी वाढली की चांगला दर मिळेल. विमानापेक्षा जलवाहतूक स्वस्त आहे. तसेच, बागायतदाराला जागेवरच पैसे मिळताना दर्जेदार हापूस परदेशात जाऊ शकतो."

- विश्‍वपाल मोरे, व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT