Mango Garden Tree Flowering Destroy In Ratnagiri Kokan Marathi News 
कोकण

आता आंबा शौकिनांच्या तोंडचे पळणार पाणी....

प्रकाश जोशी

चिपळूण (रत्नागिरी) : यंदा तालुक्‍यात आतापर्यंत ७५ टक्के हापूस आंबा झाडांना मोहोरच आलेला नाही. या प्रकारामुळे आंबा उत्पादक धास्तावले आहेत. क्‍यार वादळामुळे झालेल्या हवामानातील बदलाचा हापूस हंगामाला फटका बसणार किंवा हंगाम लांबणार, अशी शक्‍यता आहे.

यावर्षी क्‍यार वादळाचा परिणाम आंबा पिकावर काय होणार, ही हापूस आंबा उत्पादकासाठी महत्वाची ठरली होती. हवामानातील बदल, थंडीचा विस्कळित परिणाम व उष्णतामान या सर्व घटकांमुळे आंब्याला मोहोर फुटण्यास विलंब झाला. दरवर्षी साधारण स्थितीतील डिसेंबर महिन्यात मोहोर लागण्याची प्रक्रिया सुरू होते. यंदा जानेवारी महिना संपत आला, तरीही बहुतांश आंब्याला मोहोर फुटलेला नाही.

क्‍यार वादळाचा  फटका
तालुक्‍यातील हापूसच्या मोहोर फुटण्याच्या प्रक्रियेची माहिती कृषी खात्याकडून संकलित करण्यात आली. तेव्हा तब्बल ७५ टक्के झाडाला मोहोर फुटलेला नाही, असे दिसून आले. त्यासाठी तालुक्‍यातील अठरा गावात हापूस आंबा बागाची पाहणी झाली. शिरगाव व डेरवण या दोन गावातील हापूस आंब्यापैकी केवळ अर्ध्या संख्येच्या झाडाला मोहोर फुटला आहे. वारले, वहाळ, कुशीवडे व कळंबटे परिसरातील निवडलेल्या बागांमध्ये सर्वच झाडांना मोहोर फुटला आहे. दरम्यान, गुहागर तालुक्‍याला लागून असलेल्या वारले, वहाळ, कळंबटे आदी गावांच्या भागात आंब्याला चांगला मोहोर असल्याचे पाहणीत आढळले आहे.

तालुक्‍यातील आंबा उत्पादन
 एकूण आंबा बागांचे क्षेत्र ५ हजार हेक्‍टर
 हेक्‍टरी १०० झाडांची संख्या
 हेक्‍टरी अपेक्षित उत्पादन २५०० किलो ते ३५०० किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT