Uday Samant on NEET protest latest statement
esakal
रत्नागिरी : नीट परीक्षा आणि शैक्षणिक मुद्द्यांवरून दिल्लीतील आंदोलन सुरू होते; परंतु महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आंदोलनाचा वापर करत आहेत. सुरुवातीला केवळ विद्यार्थ्यांचे आणि सीजेपीचे हे आंदोलन होते ते आता विरोधकांकडून हायजॅक केले (Opposition politics over NEET protest in India) आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र सरकारवर नेम धरला जात आहे, असा थेट आरोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.