mango from konkan export before 15 days to foreign country in ratnagiri 
कोकण

पंधरा दिवस आधीच आंबा निर्यातीला सुरवात; कतार, इंग्लडला निघाला हापूस

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : वातावरणातील अनियमिततेमुळे यंदा हापूसच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता असतानाच यंदा रत्नागिरीतील आंबा निर्यात केंद्रातून ७९२ डझन आंबा कतार आणि इंग्लडला रवाना झाला. उत्पादन कमी असतानाही पंधरा दिवस आधीच निर्यातीला सुरवात झाली असून स्थानिक बागायतदारांसाठी हा दिलासा आहे.

रत्नागिरीतून थेट हापूसची निर्यात व्हावी, यासाठी आंबा निर्यात केंद्राची स्थापना केली होती. गेली तीन वर्षे हे केंद्र खासगी तत्त्वावर सद्‌गुरु एंटरप्रायझेसला चालवण्यासाठी देण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनामुळे निर्यातीसाठी अपेक्षित आंबा मिळाला नव्हता. यंदा जास्तीत जास्त निर्यात व्हावी, या उद्देशाने पावले उचलण्यात आली आहेत. आखाती देशांना कोणत्याही प्रकारची प्रक्रिया लागत नाही; मात्र युरोपसह अन्य देशांना विविध प्रक्रिया आवश्‍यक आहेत. यामधील इंग्लंडला पाठविण्यात येणाऱ्या उष्णजल प्रकियेत शिथिलता मिळाल्याचा फायदा स्थानिक बागायतदारांना होणार आहे. त्याची सुरवात झाली असून रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून थेट निर्यात सुरू झाली आहे.

रत्नागिरी तालुक्‍यातील तीन बागायतदारांकडील ४२६ डझन आंबे कतार आणि ३६६ डझन इंग्लंडला रवाना झाले आहेत. चार दिवसांपूर्वी प्रक्रिया करण्यासाठी आंबा केंद्रात दाखल झाला होता. प्रतवारी, वॉशिंग, ब्रशिंग आणि कुलिंग केल्यानंतर तो गुरुवारी (२५) हवाईमार्गे रवाना झाला आहे. 

भारतीय चलनानुसार १८०० रुपये

बागायतदारांना जागेवर ७५० ते ८०० रुपये डझन इतका दर दिल्याची माहिती मिळाली आहे. सध्या स्थानिक बाजारात दर चढे आहेत. इंग्लंडमध्ये १८ ते १९ पौंड (भारतीय चलनानुसार १८०० रुपये) इतका मिळत असल्याचे तेथील व्यवसायिकांनी सांगितले. निर्यातीसाठीचे फायटो सर्टिफिकेट सध्या मुंबईतील विमानतळावरच घेण्यात आले आहे. ते सर्टिफिकेट रत्नागिरीतील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून मिळणार आहे.

"रत्नागिरीतून निर्यातीला चालना मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बागायतदारांच्या थेट बांधावर जाऊन आंबा खरेदी केला जातो. त्यावर आवश्‍यक प्रक्रिया करून हवाईमार्गे पाठविण्यात येत आहे."

- विश्‍वपाल मोरे, व्यवस्थापक

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : कुख्यात गजानन मारणे टोळीतील फरार आरोपी बाब्या पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात, दीड वर्षांपासून गंभीर गुन्ह्यांत होता फरार

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT