mango transport issue konkan sindhudurg 
कोकण

आंबा वाहतूकदारांचा संप मागे 

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथे आंबा वाहतुकदारांनी पुकारलेला संप अखेर आज मागे घेण्यात आला. दरम्यान, या हंगामामध्ये आंबा बागायतदारांसाठी तडजोडीच्या दरात काम करणार असल्याचे वाहतुकदारांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत ठरविले. 

आंबा पेटी वाहतूक करताना 150 रुपये प्रति पेटी मागे मिळावा यासाठी वाहतूकदार ट्रक मालक यांनी संप पुकारला होता; मात्र वेंगुर्ला येथे आज माल वाहतुकदार, ट्रान्सपोर्टदार व आंबा बागायतदार यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी वाहतुकदार संघटना पदाधिकारी शिवाजी घोगळे, मनोज वालावलकर, रामदास पडते, शरद वालावलकर, श्री रामेश्वर ट्रान्सपोर्टचे जैनू पडवळ, लता गुड्‌सचे जगन्नाथ सावंत, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे श्‍याम कौलगेकर, वेंगुर्ला ट्रान्सपोर्टचे श्री. गावडे, संदिप पेडणेकर, उदय चिचकर, अंकुश वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य वाहतुकदार उपस्थित होते. 

या बैठकीत वेंगुर्ला ते वाशी-नवी मुंबई पर्यंतचे भाडे प्रति पेटीला 150 रुपये असावे, हमाली, कमिशन वजा जाता गाडी मालकास 110 रुपये मिळावेत यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत आंबा बागायतदारांच्या हितासाठी तडजोड केली. गाडीमध्ये आंबा पेटी एका जागेवर भरावी, गाडीला फिरती नसावी, दोरी बांधण्यासाठी गाडीमालक स्वखूशीने पैसे देतील ते हमालांनी घ्यावेत, गाड्या नंबरप्रमाणे भराव्यात, एक्‍सप्रेससाठी जाणारी गाडी सायंकाळी 6 वाजेर्यंत सोडण्यात यावी, लोकल वाहतुक वेळेच्या पुढे गेलीतरी त्यांना पूर्ण भाडे मिळावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले आणि आपला संप मागे घेतल्याचे वाहतूकदारांनी जाहीर केले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT