mango transport issue konkan sindhudurg 
कोकण

आंबा वाहतुकीचा तिढा अखेर सुटला

दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - आंबापेटी वाहतूक भाडेवाड दरासंदर्भात आंबा ट्रान्स्पोर्ट चालक, टेम्पोचालक आणि आंबा बागायतदारांच्यात संयुक्त तातडीच्या झालेल्या सभेत भाडेवाढीबाबत पेटीला 93 रुपयांचा दर देण्याचे निश्‍चित झाल्याने संप मागे घेण्यात आल्याचे ट्रान्सपोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांनी जाहीर केले. 

येथील साईमंगल कार्यालयात आंबापेटी वाहतूक भाडेवाड दरासंदर्भात योग्य निर्णय न झाल्याने वाहतूकदारांनी संप पुकारला होता. सद्यस्थितीत डिझेलचे भाव वाढल्याने प्रतिपेटी वाहतुकीचा खर्च भागत नसल्याने आंबा ट्रान्स्पोर्ट चालक, टेम्पोचालक आणि आंबा बागायतदार यांच्या संयुक्त तातडीची बैठक आयन्स्जित करण्यात आली होती. सदरची बैठक ट्रान्स्पोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांच्या अध्यक्षतेखाली व महासंघाचे पदाधिकारी मनोज वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत आंबा ट्रान्सपोर्ट मालक, वाहतूकदार व आंबा बागायतदार शेतकरी यांच्यात अंतिम चर्चा होऊन 93 रुपये प्रति पेटी दर देण्याचा तसेच रस्सीचे पैसे स्वखुशीने देण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी वेंगुर्ल्यातील गाड्यांना प्राधान्य द्यावे, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे ट्रान्स्पोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांनी जाहीर केले. 

या चर्चेत रामेश्‍वर आंबा सर्व्हिसचे मालक जनार्दन पडवळ, लता गुड्‌स ट्रान्स्पोर्टचे मालक जगन्नाथ सावंत, सिद्धिविनायक ट्रान्स्पोर्टचे मालक श्‍याम कौलगेकर, वेंगुर्ले ट्रान्स्पोर्टचे मालक दादा गावडे, आंबा व्यापारी विरेंद्र कामत-आडारकर, नागेश उर्फ पिंट्या गावडे, नीलेश चमणकर, यशवंत ऊर्फ बाळू परब, गजानन वेर्णेकर, अनिल मांजरेकर, बाळा मांजरेकर, गिरीश मांजरेकर, प्रताप आसोलकर, चेतन पेडणेकर, नारायण पेडणेकर, बबलू कुबल, संदेश निकम, अजित राऊळ, कांबा काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर तसेच ट्रान्स्पोर्ट संघटनेचे शिवाजीराव घोगळे, मनोज वालावलकर, शरद वालावलकर, वेंगुर्ले टेम्पो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संदिप पेडणेकर, सोनू शेख, गोल्डन फर्नांडिस, उदय चिपकर यांचा समावेश होता. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : नवी मुंबईत आकाराला येणार अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क'चा शुभारंभ!

Manoj Jarange: ‘कितीही प्रयत्न झाले तरी सत्य बाहेर आणणारच’; ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT