gadkari Chiplun Flyover esakal
कोकण

Chiplun Flyover: कोसळलेल्या उड्डाणपुलाला मनसेने दिले गडकरींचे नाव, बॅनरबाजीतून वादास खतपाणी

मुझफ्फर खान -सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. 19 : कोसळलेल्या उड्डाणपुलाला नितीन गडकरींचे नाव देत मनसेने बॅनरबाजी केली आहे. यावरून भाजप-मनसेत वादाची ठिणगी पडल्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले बांधकाम मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या दरम्यान या महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान सोमवारी दुपारी पूल कोसळला. या महामार्गावरील या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या अपघाताला नितीन गडकरीच जबाबदार असल्याचे मनसेने ही बॅनरबाजी करत म्हटले आहे.

चिपळूण येथे कोसळलेल्या पुलाला केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे नाव देऊन मनसेने वाद निर्माण केला आहे. चिपळूणच्या बहादूरशेख नाक्यावरील पुलाचा भाग मधोमध तुटल्याने खळबळ उडाली होती.

या ठिकाणी नितीन गडकरी यांच्यावर शेरेबाजी करत बॅनरबाजी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गडकरी यांच्या या बॅनरला भाजपने अद्याप उत्तर दिलेले नाही.

बहादूरशेख नाक्यावरील गर्डर कोसळण्याची घटना घडली. या घटनेला सर्वस्वी राष्ट्रीय प्राधिकरण विभाग आणि या खात्याचे मंत्री जबाबदार आहेत. गडकरी मोठमोठ्याने घोषणा करतात. त्यांनी या अपयशाचेही श्रेय घ्यावे.

- राजू खेतले, जिल्हाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT