० 
कोकण

वैभववाडी तालुक्यातील युवा नेत्याचा अनेकांना गंडा 

एकनाथ पवार

वैभववाडी (ता. सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील एका युवा नेत्याने स्वतःच्या पक्षासह अनेकांना हजारो रुपयांचा गंडा घातला. फसवणुकीसाठी त्याने सोशल मीडियाचा वापर केला आहे. फसवणूक झालेले अनेकजण त्याचा शोध घेत आहेत. फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने त्या युवा नेत्याची एक दुचाकी काढून घेतली आहे. सध्या या प्रकाराची चर्चा सध्या सुरू आहे. 

तालुक्‍यातील एका युवा कार्यकर्त्याने दीड वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश केला होता. राजकारणात आल्यापासून त्याने आतापर्यत तीन पक्ष बदलले आहेत. सध्या ज्या पक्षात कार्यरत होता त्या पक्षाने त्याच्यावर युवा पदाची जबाबदारी दिली होती. पद मिळाल्यानंतर त्याने पक्षाच्या वरिष्ठांच्या भोवती घिरट्या घालण्यास सुरूवात केली. दौऱ्यावर आलेल्या आपल्या आमदार, खासदार, मंत्र्यासोबत फोटो काडून ते मोबाईल स्टेटसवर ठेवत होता. पक्षाच्या सर्व कार्यक्रम, सभा आणि प्रत्येक उपक्रमात अग्रभागी राहून त्याने तालुका, जिल्हा आणि जिल्हाबाहेर आपली ओळख निर्माण केली. या ओळखीतून तो सर्वाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद ठेवत असे. 

पुण्यातील पक्षाच्या एका कार्यकर्त्याला आपल्याकडे हापूस आंबे आहेत. कुणाला हवे असतील तर सांगा असे सांगीतले. त्या कार्यकर्त्याने आपल्यालाच विक्रीसाठी आंबे हवे आहेत असे सांगून त्याने त्या युवा कार्यकर्त्याच्या खात्यावर 50 हजार रुपये भरले; परंतु प्रत्यक्षात त्याने कधीच त्या व्यक्तीला आंबे दिले नाही. त्यामुळे त्याने पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजले. संपर्कात आलेल्या अनेकांच्या मोबाईलवर मला तातडीची गरज आहे, पंधरा हजार रुपये मिळतील का, कधी वीस हजार तर कधी पाच हजार अशी मागणी तो करीत असे. पक्षाच्या कार्यालयात ये-जा करणाऱ्या काहीना नोकरीला लावतो असे सांगून त्याने अनेकांना गंडा घातला. आतापर्यत 35 ते 40 लोकांना आठ ते दहा लाख रूपयांचा गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्या स्थानिक त्या युवा पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन पैशाचा तगादा लावत आहेत. फसवणुक झालेल्या एकाने तर त्या युवा नेत्याची दुचाकी काढून घेतली आहे. 

पक्षाचे पदाधिकारी देखील हैराण 
युवा नेत्याच्या या फसवणुकीच्या नवनवीन फंड्यामुळे नातेवाईक मेटाकुटीस आले आहेतच; परंतु पक्षाचे पदाधिकारी देखील हैराण झाले आहेत. उच्च पदावर काम करणाऱ्या लोकांशी आपले संबंध आहेत. असे तो अजुनही तोरा मिरवत आहे. या युवा नेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेली मागणी आता त्या पक्षाच्या नेत्यांपर्यत पोहोचली आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडे फसवणुकीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आता पक्ष पदाधिकारी नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये जसकीरतच्या बहिणीची चर्चा! तिच्या सौंदर्य पाहून अलिनाही वाटेल फिकी

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (PWC) अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण

SCROLL FOR NEXT