Maratha Reservation esakal
कोकण

Maratha Reservation : आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्यांना समाज जागा दाखवेल; मराठा सेवा संघाचा स्पष्ट इशारा

'ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र घ्यायचं नसेल त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही.'

सकाळ डिजिटल टीम

मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेणाऱ्यांना कोकणातील समाज जागा दाखवेल.

खेड : संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) आंदोलन सुरू असताना कोकणात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळाले. कोकण हा लढवय्या प्रांत असताना कोकणातील मराठा समाज शांत आहे. कुठेच मोर्चा नाही, आंदोलन नाही. त्यामुळे कोकणातील मराठा समाजावर कोणत्या शक्तीचा दबाव आहे. कोण मराठा समाजाला आंदोलनात उतरण्यास अडचण निर्माण करत आहे? असा आरोप मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते केशवराव भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

शहरातील मराठा भवन येथील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी केलेले आंदोलन हे सर्वसामान्य मराठा समाजातील तरुणांसाठी आहे. ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र घ्यायचं नसेल त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही; पण ज्यांना त्याची खरी गरज आहे त्याला विरोध कशासाठी? खेड तालुक्यातील मराठा समाजाचा मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा असून जो आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढेल त्यालाच मराठा समाज मतदान करेल.

कोकणातील मराठा समाजाच्या नेत्यांना राजकारणातून संपवले जात आहे. मराठा आरक्षणाविरोधी भूमिका घेणाऱ्यांना कोकणातील समाज जागा दाखवेल. माजी आमदार संजय कदम यांनी खेडमधील मराठा समाज हा मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे सांगितले. या वेळी मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर सुर्वे, सरचिटणीस यशवंत कदम, दीपक गुजर, नंदू साळवी, हेमंत साळोखे, संजय कडू, विश्वास शिंदे, रोहन विचार, मनोज भोसले, शरद शिर्के, दीपक नलावडे, अंकुश विचारे आदी मराठा समाजातील नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

Phulambri News : शेतकऱ्यांच्या शेतातच मृत्यूचा सापळा..! लोंबकाळणाऱ्या वीजतारांनी वाढवला धोका; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

Doordarshan Veteran Passes Away: दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर मोहोर उमटविणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक अरुण काकतकर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT