uday samant
uday samant sakal
कोकण

पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात; उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोहोचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी, कोकण मराठी साहित्य परिषद, कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी खासदार विनायक राऊत, विश्वस्त प्रमुख कोमसाप रमेश कीर, कोमसापचे अरुण नेरुरकर, नमिता कीर, गजानन पाटील उपस्थित होते.मंत्री सामंत म्हणाले, ‘मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असून ते त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. सातशे वर्षांपूर्वीच्या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे; मात्र बाराशे वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकत नाही. यासाठी आपण सर्वांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे.’’

खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘‘शासनस्तरावर मराठी भाषा समृद्ध, सुदृढ होण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते करण्यात येत आहे.’’ कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर म्हणाल्या, ‘‘मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. वाचन, लेखन संस्कृती वाढविणे आवश्यक आहे.

आलीयाचा गौरव

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचनाचे महत्त्‍व या विषयावर आलिया या मुलीने मराठीमध्ये आपले विचार मांडले. वक्तृत्व स्पर्धेत तिने मराठी केलेल्या भाषण शैलीचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. तिचा मंत्री सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT