कुपोषण 
कोकण

15 जिल्ह्यांतील कुपोषणाची स्थिती शासनाकडे नाही!

भगवान खैरनार

मोखाडा - राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी एकत्र येउन, 11 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. संपावर जाण्यापूर्वी बाल विकास प्रकल्पाधिकारी कार्यालयांना, कुपोषित बालकांच्या स्थितीची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिलेली नाही. त्यामुळे मुळातच कुपोषणाच्या विळख्यात असलेल्या राज्यातील 15 आदिवासी जिल्ह्यांतील कुपोषणाची स्थिती शासनाकडेही उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या संप काळात कुपोषणाची व बालमृत्यू ची खरी स्थिती शासनाकडे च उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे.  

कुपोषणाचा दाह कमी करण्यासाठी, राबणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी 11 सप्टेंबर पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आदिवासी जिल्ह्यांमधील कुपोषित बालकांच्या पोषण आहार पुरवठ्याची योजना अडचणीत आली. या योजनेच्या अंमलबजावणी साठी महिला बालकल्याण विभागाने आशा कार्यकर्ती, शिक्षक व ग्रामसेवकांमार्फत राबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आशा कार्यकर्ती ला संप काळात पोषण आहार सुरू ठेवण्यासाठी वाढीव मानधन देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे काही प्रमाणात आदिवासी जिल्ह्यांमध्ये पोषण आहार सुरू झाला आहे. 

मात्र, अतिदुर्गम भागात आजही या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचे, सद्यस्थितीत बालमृत्यूच्या घटनांनी समोर आले आहे. मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्हयात 1 ते 20 सप्टेंबर दरम्यान 27 बालमृत्यू झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते आहे. तर जुलै महिन्यात 655 अतितीव्र आणि 3 हजार 621 तीव्र कुपोषित बालके मृत्यू च्या दाढेत अडकल्याचे सरकारी अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT