the masoon of hapus mango on kokan late for this year due to heavy rain and atmosphere in sindhudurg 
कोकण

यंदाचा हापूस हंगाम लांबणीवरच ?

सकाळ वृत्तसेवा

देवगड : सिंधुदुर्गात थंडीला सुरूवात झाल्याने आंबा मोहोरासाठी पोषक वातावरण बनले आहे; पण लांबलेल्या पावसामुळे झाडांना पालवी आल्याने यंदाही हापूसचा हंगाम लांबण्याची शक्‍यता आहे. झाडांना आलेली पालवी टिकवून ठेवण्यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

यंदा पावसाचे प्रमाण सुरूवातीपासून समाधानकारक राहिले; मात्र अवकाळी पावसाने ऑक्‍टोबरपर्यंत हजेरी लावली. भातशेतीच्या दृष्टीने अखेरचा पाऊस अडचणीचा ठरला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना अडचणीत आणल्याचे चित्र होते. पाऊस लांबल्याने आंबा हंगाम यंदा लांबणीवर जाण्याची अटकळ बांधली जात होती; मात्र गेले काही दिवस वातावरणात बदल जाणवत आहे. आता किनारपट्टीवर आंबा हंगामाला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे.

गार वाराही सुटत आहे. बदलते वातावरण आंबा बागायतदारांच्या दृष्टीने सुखावह ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत; मात्र असे असले तरीही झाडांना आता पालवी फुटू लागली आहे. किरकोळ प्रमाणात मोहोराचे तुरे दिसत असले तरीही त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. झाडांना आलेली पालवी टिकवून ठेवण्यासाठी प्रयोगशील बागायतदारांची फवारणी सुरू झाली आहे. आलेली पालवी चांगली जून झाल्यास वेळीच मोहोर येईल अशा पद्धतीने नियोजन सुरू झाले आहे.

झाडांमधून निर्धोक मोहोर बाहेर पडण्यासाठी बागायतदारांनी फवारणी सुरू केली आहे. काही प्रगतिशील आंबा बागायतदारांचे फवारणीचे नियोजन यापूर्वीच सुरू झाले आहे; मात्र यंदा पाऊस लांबल्याने थंडी पडण्यास उशिरा सुरूवात झाली. झाडांना मुबलक प्रमाणात पालवी आली आहे. त्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी बागायतदार प्रयत्नशील आहेत; मात्र तूर्त तरी यंदाचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्‍यता दिसू लागली आहे.  

"पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने आंबा कलमांना आता पालवी फुटली आहे. मोठ्या प्रमाणात झाडांना पालवी आली आहे. कलमांना आलेली पालवी जून होऊन त्यामधून मोहोर बाहेर येण्यास काही कालावधी जाईल. काही झाडांवर किरकोळ प्रमाणात मोहोर दिसतो; मात्र बहुतांशी झाडांना पालवी फुटली असल्याने यंदाचा हंगाम लांबण्याची शक्‍यता आहे."

- विनायक पारकर, ज्येष्ठ आंबा बागायतदार, वरेरी, ता. देवगड

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT