medical college in ratnagiri establish said uday samant in konkan 
कोकण

'रत्नागिरी मेडिकल कॉलेज ही काळ्या दगडावरची रेघ'

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मेडिकल कॉलेजबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांनी आधी त्याचा अभ्यास करावा आणि नंतर बोलावे. केंद्र शासनाच्या बृहत्‌ आराखड्यात रत्नागिरीचे नाव नसले तरी विशेष बाब म्हणून रत्नागिरी मेडिकल कॉलेज उभारणार, ही काळ्या दगडावरची  रेघ आहे. विरोधकांनी समोर बसून चर्चा करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.  

अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर भाजपच्या विरोधकांनी त्यावर टीका केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गासह ७ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होणार ही घोषणा हवेतच राहिली.’’ 

याला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या बृहत्‌ आराखड्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजचे नाव नाही; मात्र राज्यासाठी मेडिकल कॉलेज कसे करतात, त्याचा अभ्यास करायला हवा. त्यासाठी विधिमंडळात माहिती घेतली पाहिजे. अपूर्ण माहिती घेऊन विरोधकांनी बोलू नये. जसे बार कौन्सिल आले तसे मेडिकल कौन्सिल आहे. त्यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला मंजुरी मिळेल. शिवसेनेने शब्द दिला म्हणजे रत्नागिरीत मेडिकल कॉलेज होणार, ही काळ्या दगडावरची  रेघ आहे.’’ 

माझे विरोधकांना आवाहन आहे की, त्यांनी विकासात्मक चर्चेसाठी कधीही समोरासमोर बसावे. त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. सिव्हिल हॉस्पिटलमधील भ्रष्टाचाराचा आठ दिवसांत पोलखोल करणार, असे भाजपच्या युवा नेत्यांनी स्पष्ट केले होते. आठ दिवस होऊन गेले, ते अजून आहेत कुठे, असा टोलाही सामंत यांनी लगावला.  

शहरातील रस्ते होणार चकाचक

सुधारित नळ-पाणी योजना आणि सीएनजी गॅस पाईप टाकण्यासाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांची आणि शहरवासीयांची मोठी गैरसोय होत आहे. पाणी आणि गॅसचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी आतापर्यंत चांगले सहकार्य केले. यापुढेही सहकार्य करावे, कारण १५ मेपर्यंत शहरातील सर्व रस्ते चकाचक केले जातील, हा मंत्री म्हणून उदय सामंत यांचा शब्द आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने घट; कोल्हापुरात अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT