Shivani Khanwilkar
Shivani Khanwilkar sakal
कोकण

आमदारांना भेटलीस..? म्हणून पत्ता कट

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : आमचे नगराध्यक्षपदाचे नाव आधीच पाच दिवसांपूर्वीच ठरले होते. तू निवडून आल्यावर आमदार योगेश कदम यांना भेटलीस ना म्हणून, असे प्रभारींनी सांगितले, अन मी अवाक्‌ झाले. कोण आहेत योगेशदादा कदम? शिवसेनेचेच आमदार ना? निवडून आल्यावर शिवसेनेच्या अधिकृत आमदारांची भेट घेणे, हा पक्षद्रोह होतो, नगराध्यक्षपद नाकारण्याचं ते कारण होतं? हे जर असे असेल तर खरंच मला राजकारण कळत नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या शिवानी खानविलकर यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर शिवानी खानविलकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, ‘खरं सांगायचं म्हणजे राजकारण मला कळत नाही. माझं कुटुंबच शिवसेनेचे आहे. निवडून आल्यावर मी नवनिर्वाचित सदस्यांसमवेत पक्षाच्या, आघाडीच्या सर्व वरिष्ठांना भेटले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. महिला सर्वसाधारण गटाचे आरक्षण निश्चित झाले. एक महिला व सर्वात तरुण, सुशिक्षित नगरसेविका म्हणून मला नगराध्यक्षपदाची संधी पक्षाकडून मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. सर्व संबंधित वरिष्ठांना भेटले. यात काही चुकीचे वाटत नाही. अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री एका ज्येष्ठ प्रभारींना मी फोन केला. त्यांनी मला सांगितले, ममता मोरे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित केले आहे. काहीच हरकत नव्हती. मलाही पक्षादेश मान्य आहे, पण मला नगराध्यक्षपद नाकारताना जे कारण त्यांनी सांगितलं, ते धक्कादायक होतं.

आमची स्वप्नं वेगळी आहेत..

शहरासाठी, नागरिकांसाठी किमान पक्षवाढीसाठी काम न करता, आपल्याच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, प्रत्यक्ष आमदारांना बहिष्कृत करणं म्हणजेच राजकारण असेल तर मला ते कळत नाही. आजची युवाशक्ती असले राजकारण करणार नाही. आमची स्वप्नं वेगळी आहेत, ध्येयं वेगळी आहेत, असेही खानविलकर यांनी बोलुन दाखवले.

हा जर गुन्हा असेल तर...

मला वाटलं होतं, निवडणूक झाली. आता सर्व मतभेद संपले; पण तसं नव्हतं तर. मग आपल्याच आघाडीतला एक मित्रपक्ष, शेजारच्या नगरपंचायतीत निवडून आलेल्या आपल्याच पक्षाच्या अपक्षांना घेऊन गटनोंदणी करतं, तर आपण का नाही? तिथले अपक्षही पक्षाविरुद्ध, आघाडीविरुद्धच लढले ना? आणि निवडून आले. आपला पक्ष वाढवणं, आपली नगरपंचायतीत ताकद वाढवणं हा जर गुन्हा असेल तर मला राजकारण कळत नाही.

मला राजकारण कळत नाही

मी नगराध्यक्षपदाची अपेक्षा बाळगली, ही चूक केली असं मला वाटत नाही. माझीही या शहराबद्दलची स्वप्नं आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाणारं हे शहर तशाच ओळखीचं राहावं, असं सर्व दापोलीकरांप्रमाणे मलाही वाटतं. वाढत्या शहराचं भविष्यातील नियोजन, त्याचं सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन याबद्दल माझ्याही संकल्पना आहेत. आपल्याच पक्षाकडे नगराध्यक्षपदाची अपेक्षा बाळगणं हा गुन्हा असेल तर मला राजकारण कळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT