meeting with festival of god in ratnagiri meeting with uday samant ratnagiri 
कोकण

शिमगोत्सव साजरा होणार, पण कोरोना निकषात : उदय सामंत

राजेश कळंबटे

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचा प्रसिध्द देव भैरीसह इतर सर्व देवस्थान मंडळांनी शासन व प्रशासन यांच्या आवाहनानुसार मर्यादीत स्वरुपात आणि कोरोनाच्या सूचनांचे पालन करत शिमगोत्सव साजरा करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरीतील शिमगोत्सव 18 मार्चपासून साजरा करण्यास सुरुवात होत आहे. कोरोनामुळे गर्दी होऊ नये यासाठी संयुक्त बैठक मंत्री झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिमगोत्सव कसा साजरा करायाचा यावर चर्चा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत मंत्री सामंत, भैरी देवस्थानचे मुन्ना सुर्वे, अ‍ॅड. भाऊ शेट्ये यांनी माहिती दिली. सामंत म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी शासनाने आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. रत्नागिरीतील भैरी देवाचा शिमगा गर्दी न करता साजरा होईल. भैरीची पालखी गाडीतून नेहमीच्या मार्गाने प्रवास करेल. ज्या भागात गाडी जाणार नाही, तिथे पन्नास माणसांच्या उपस्थितीत खांद्यावरुन पालखी नेण्यात येईल. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत दर्शनाला मंदिर खुले राहील. त्यानंतर मंदिरात दर्शन बंद केले जाईल. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. स्थानिकांसह परजिल्ह्यातील लोकांना सायंकाळनंतर दर्शनासाठी ऑनलाईन व्यवस्था देवस्थान करणार आहे. 

रत्नागिरीतील अन्य देवस्थानांमध्ये याबाबत जागृती करण्याची जबाबदारी प्रांताकडे सोपवली आहे. पोलिस, आरोग्य विभाग आणि महसूलचे अधिकारी गावागावात जावून बैठका घेतील. कोणतीही अडचण न येता हा शिमगोत्सव साजरा व्हावा असे साकडे भैरीला घातले आहे. याबाबत भैरी देवस्थानचे मुन्ना सुर्वे म्हणाले, शिमगोत्सवासंदर्भात निर्णय झाला असून बारा वाड्यांची लवकरच बैठक होईल. सद्यःस्थितीत भैरीची पालखी खेळवली जाणार नाही. पालखीबरोबर पन्नास लोकच उपस्थिती राहतील. होळीही होमापासून शंभर मिटर अंतरावरच असून ती सहज नेता येईल अशी छोटी आहे. उलपे देण्यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. प्रथा, रुढी, परंपरा भंग न होता हा उत्सव साजरा केला जाईल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT