In a meeting held here today by Mayor Sanju Parab in sindhudurg 
कोकण

सिंधुदुर्गात चाकरमान्यांना मिळणार पेड क्वारटांईन ; पण या असणार अटी....

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : मुंबई पुणे आधी रेड झोन मधून येणाऱ्या सावंतवाडीकरांना पालिका प्रशासन पेड क्वारटांईन करणार आहे. यासाठी शहरातील चार हाॅटेल्स प्रशासनाने निवडली असुन ज्या नागरिकांना पेड क्वारटांईन व्हायचे नसल्यास त्याने शासकीय इमारतींमध्ये स्वव्यवस्थेने क्वारटांईन  राहायचे आहे, मात्र आॅरेज व ग्रीन झोनवाल्यांना होम क्वांरटाईन करण्यात येणार असल्याचे  नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित बैठकीत सांगितले.तर शहरा शिवाय कुठल्याही ग्रामीण भागातील व्यक्तीला या हॉटेलमध्ये क्वारटांईन करून घेऊ नये, तसेच व्यवसाय व सेवा यांची सांगड घालून कमीत कमी दर हाॅटेल व्यवसायकांनी आकारावा अशी सूचनाही संजू परब यांनी नेमण्यात आलेल्या चार हॉटेल मालकांना दिली.

शहरात येऊ इच्छीणार्यानी मुंबई पुणे तसेच इतर भागातील चाकरमानी व व शहरवासीयांना खबरदारी म्हणुन क्वारटांईन करण्यासंदर्भात नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच हॉटेल व्यावसायिकांची बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे महिला पोलीस अधिकारी स्वाती यादव उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ.उत्तम पाटील उपस्थित होते.


यावेळी व्यापारी बांधव तसेच पालिका प्रशासनामध्ये क्वारटांईन  करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांना कशा पद्धतीने पेड क्वारटांईन करण्यात येणार आहे, एखाद्या व्यक्तीला ज्या हाॅटेलच्या रूम मध्ये क्वारटांईन करण्यात येणार आहे ती व्यक्ती पॉझिटिव निघाल्यास ते हॉटेल किंवा तो रूम सील करण्यात येणार आहे का शिवाय निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे का? क्वारटांईन व्यक्तीवर कोणाची निगराणी राहणार आहे, रेड झोन मधील व्यक्ती च्या हॉटेलमध्ये  क्वारटांईन असणार आहे त्या हॉटेलच्या रूम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास एखादा टेक्निशियन त्या ठिकाणी जाणार नाही मग अशा वेळी काय करणार,क्वारटांईन असणाऱ्या व्यक्तींची कितव्या दिवशी स्वॅप तपासणी होणार आहे आधी प्रश्न त्यांनी उपस्थित करत हाॅटेल मालकांना नियमावली ठरवुन द्या अशी मागणी केली.


याबाबत खुलासा करताना मुख्याधिकारी श्री जिरगे यांनी क्वारटांईन करण्यात येणाऱ्या प्रत्येक हॉटेलवर पालिकेचा एक नोडल ऑफिसर व इतर प्रशासकीय यंत्रणा देखरेख ठेवणार आहे याशिवाय पोलिसांची निगराणी ही या हॉटेल वर राहणार आहे. ज्या हॉटेलवर एखादी व्यक्ती क्वारटांईन असल्यास त्या हॉटेलमध्ये उपलब्ध असणारे जेवण त्याला मिळणार आहे, शिवाय 14 दिवसाच्या क्वारटांईन काळात  संबंधित व्यक्तीला लागणारे बेडशीट, टाॅवेल चादर आदी आवश्यक वस्तु एकाच वेळी देण्यात येणार आहे, रुममधील वेस्ट कलेक्शनसाठी पालिकेचा कर्मचारी पाच दिवसाच्या फरकाने एकदा त्या ठिकाणी जाणार आहे, तसेच कमीत कमी भाडे संबधित व्यक्तींना आकारण्यात येणार असुन तशी बोलणी हाॅलेट मालकाशी करण्यात आली आहे.

ज्या नागरिकाला किंवा व्यक्तीला पेड  क्वारटांईन होणे परवडत नसेल तर त्या व्यक्तीसाठी शासकीय इमारतीमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे मात्र त्याच्या जेवणाची व इतर गोष्टीची सर्व जबाबदारी त्यांनी पार पाडायची आहे. प्रशासन या नात्याने आम्ही आमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आहोत मात्र काही समस्या निर्माण झाल्यात शहरवासियांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.वैद्यकीय तपासणी बाबत डॉक्टर उत्तम पाटील म्हणाले मुंबई पुणे या ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्तींची जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या आरोग्य पथकाकडून तपासणी होणार आहे आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा उपजिल्हा रुग्णालयातही तपासणी करण्यात येणार आहे तसेच रेड व कंटेनमेंट झोन मधील क्वारटांईन करण्यात येणाऱ्या व्यक्तींची सहाव्या दिवशी स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.


नगराध्यक्ष श्री परब म्हणाले, शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचलले आहे ज्या हॉटेल पालिकेकडून निवडण्यात आल्या आहेत त्या हॉटेल मालकांना कमीत कमी भाडे क्वारटांईन असणाऱ्यांना आकारण्यात यावे असे स्पष्ट केले आहे मात्र शहरातील लोकांना वगळता ग्रामीण भागातील कुठल्याही व्यक्तीला या हॉटेलमध्ये क्वारटांईन करून घेऊ नये शहरातील व्यक्ती ज्यावेळी आपल्या सही शिक्क्याचे पत्र दाखवेल त्याच वेळी त्या व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा शहराच्या हिताच्या दृष्टीने कुठलीही दिरंगाई होणार नाही आजपर्यंतची शहराची सुरक्षा जपली आहे तशीच सुरक्षा यापुढेही जपली जाईल त्यामुळे शहरवासीयांनी सहकार्य करावे.यावेळी जितू पंडित, डी. के. सावंत, वल्लभ नेवगी, बाळ बोर्डेकर, महेश कुमठेकर, संतोष कुलकर्णी, विहंग देवस्थळी, प्रथमेश महाडेश्वर व अन्य हॉटेल व्यवसायिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT