Uday Samant
Uday Samant  esakal
कोकण

'शिवसेना पक्षप्रमुख आमचं दैवत, टीका अजिबात खपवून घेणार नाही'

राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) : जन आशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra 2021) ही मोदी सरकारची (Modi Government) कामगिरी सांगण्यासाठी असेल, तर आमचं काहीही म्‍हणणं नाही; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करण्यासाठी यात्रेचा उपयोग होत असेल, तर त्‍यावर रिॲक्‍शन ही होणारच असा इशारा पालकमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी आज दिला. मनाई आदेशाचे उल्‍लंघन झाले तर प्रशासन योग्‍य ती कारवाई करेल, असेही ते म्‍हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख हे आमचे दैवत आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्यावर कुणी टीका करू नये.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्‍या पालकमंत्री सामंत यांनी आज येथील शिवसेना संपर्क कार्यालयात येऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्‍यानंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, ``भाजप सरकारने (BJP Government) गेल्या सात वर्षात विकासाची काय कामे केली हे सांगण्यासाठी, तसेच जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा आहे. त्‍यामुळे शिवसेनेवर टीका करण्यासाठी या यात्रेचा उपयोग कुणी करू नये.

शिवसेना पक्षप्रमुख हे आमचे दैवत आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्यावर कुणी टीका करू नये. त्‍यांची बदनामी तर आम्‍ही अजिबात खपवून घेणार नाही. तरीही जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका झाली तर त्‍याची रिॲक्‍शन देखील निश्‍चितपणे होणार आहे.`` श्री. सामंत यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, संदेश पटेल, शैलेश भोगले व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवे केंद्रीय मंत्री काय शह देणार?

केंद्रात नव्याने समाविष्‍ट झालेले मंत्री शिवसेनेला काय शह देणार? असाही सवाल राणेंचे नाव न घेता श्री.सामंत यांनी उपस्थित केला. कोकणातून चार नव्हे चाळीस मंत्री झाले तरी ते शिवसेनेला शह देऊ शकत नाहीत. ते म्‍हणाले, ``खेडमध्ये शिवसेनेचे आमदार, चिपळूणमध्ये राष्‍ट्रवादीचे, रत्‍नागिरीमध्ये मी स्वत: आमदार आहे. राजापूरमध्ये राजन साळवी, गुहागरमध्ये भास्कर जाधव आमदार आहेत तर रत्‍नागिरीचे खासदार तसेच सावंतवाडी आणि कुडाळचे आमदार शिवसेनेचे आहेत. एवढा सगळा कोकण शिवसेनेचा बालेकिल्‍ला असताना आम्‍हाला शह देण्याची भाषा कुणी करू नये. तशी भाषा कोण बोलत असेल तर त्‍यांना उत्तर देण्यासाठी प्रत्‍येक गावातील, तालुक्‍यातील शिवसैनिक समर्थ आहे.``

Uday Samant

...तर जिल्‍हाधिकारी कारवाई करतील

जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राहावी, यासाठी जिल्‍हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केले आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने या आदेशाचे कुणी उल्‍लंघन करत असेल तर त्‍यांच्यावर जिल्‍हाधिकारी कारवाई करतील असेही पालकमंत्री श्री.सामंत म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT