Electrification of Konkan Railway track 
कोकण

कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तीन तासांचा मेगा ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा

कणकवली, ता. २९: कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे - चिपळूण आणि मडुरे - मडगाव जंक्शन दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तीन तास मेगा ब्लॉक घेण्यााचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ आक्टोबरला विन्हेरे - चिपळूण विभागात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे या मार्गावरील काही रेल्वे गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे. यात गाडी क्र. ०२१९७ कोईम्बतूर ते जबलपूर विशेष प्रवास ३० आक्टोबर मडगाव जंक्शन दरम्यान ९० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

तसेच गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेसचा प्रवास चिपळूण स्टेशन दरम्यान ९० मिनिटांसाठी नियमित केला जाईल. मडुरे - मडगाव विभागात मंगळावारी (ता.३१) दुपारी १.२० ते सायंकाळी ४.२० पर्यंत मेगा ब्लॉक आहे.

यामुळे गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी - सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान ८० मिनिटांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. २२११९ मुंबई सीएसएमटी - मडगाव तेजस एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान ६० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

गाडी क्र. १२६१८ निजामुद्दीन ते एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस प्रवास कणकवली स्थानकावर २० मिनिटांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. २१४९ एर्नाकुलम जंक्शन ते पुणे एक्स्प्रेस प्रवास कारवार ते मडगाव जंक्शन स्टेशन दरम्यान ५५ मिनिटांसाठी नियमित केला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT