कोकण

जहाज हलवण्यासाठी तीन फायली पत्रव्यवहार; वर्षभर मिर्‍यात हेलकावतेय

- राजेश शेळके

प्रशासनाने त्यांच्या मध्यस्थीने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मेरीटाईम बोर्डाचा युनायटेड अरब-अमिरातीच्या दुतावासाशी पत्रव्यवहार सुरू आहे.

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळात भरकटलेले इंधनवाहु 'बसरा स्टार' (basra star) जहाज दुसरे चक्रीवादळ (Hurricane) झाले तरी मिर्‍या किनार्‍यावरच अडकून पडले आहे. मेरीटाईम बोर्डाकडून याचा कसोशीने पाठपुरावा सुरू आहे. युनायटेड अरब-अमिरातीच्या दुतावासाशी जहाजाबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोरोना (Corona) महामारीमध्ये दुतावास बंद आहे. त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या तीन फाईल (Three File) झाल्या आहेत. वारंवार पाठपुरावा सुरू आहे, परंतु महामारीमुळे जहाज काढणे लांबणीवर पडले आहे. (merchant vessel basra star remains grounded in ratnagiri near mirkarwadi)

बसरा स्टार हे इंधनवाहू जहाज मिर्‍या समुद्रकिनार्‍यावर अडकून 3 जूनला 2021 ला वर्ष होणार आहे. अजून जहाज कंपनीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. किनारा सुरक्षेच्यादृष्टीने मेरीटाईम बोर्ड वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करीत आहे.

गेल्या वर्षी 3 जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळात हे जहाज भरकटले होते. दक्षिण आफ्रिकेतून ते शारजा-दुबईला निघाले होते. भगवती बंदरापासून काही अंतर आत ते नांगरुन ठेवण्यात आले होते. मात्र अजस्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिर्‍या समुद्रकिनारी लागले. या जहाजामध्ये 13 क्रुजर होते. मेरीटाईम बोर्ड, पोलिस, तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून 13 जणांचा जीव वाचविण्यात यंत्रणेला यश आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मध्यस्थीने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मेरीटाईम बोर्डाचा युनायटेड अरब-अमिरातीच्या दुतावासाशी पत्रव्यवहार सुरू आहे.

आमचा अरब-अमिरातीच्या दुतावासाशी जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे. पाठपुराव्यात आम्ही कुठेच कमी पडलेलो नाही. अरब-अमिराती दुतावास आणि दिल्लीचा दुतावासही कोरोना महामारीमुळे बंद आहे. त्यामुळे जहाज काढण्याबाबचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

- कॅ. संजय उगलमुगल, प्रादेशिक बंदर अधिकारी, रत्नागिरी

(merchant vessel basra star remains grounded in ratnagiri near mirkarwadi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT