Message Of Social Distancing From Student Through Painting 
कोकण

विद्यार्थ्याने दिला चित्रकलेतून सोशल डिस्टनिंगचा संदेश 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - जगभर कोरोनाची विषाणूची दहशत असताना शाळाही बंद आहेत. अशा स्थितीत येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घरी बसून आपल्या कलेला वाव देत सोशल डिस्टन्सिंगचा संदेश चित्रकलेच्या माध्यमातून समाजमनावर बिंबविला आहे. 

कळसुलकर इंग्लिश स्कूलमधील सहावीतील विद्यार्थी जयराम जयेश राऊळ याने सोशल डिस्टंसिंग कसे आणि कुठे कुठे पाळावे, याचा संदेश देणारे चित्र रेखाटले आहे. ज्यामधे जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा दुकान, दूध डेअरी यांच्या बाहेर गर्दी न करता किमान 1 मीटर अंतर ठेऊन ग्राहक मास्क लावून उभे आहेत. ग्राहकांनसाठी खास चौकोन आखले आहेत. दुकानदारही मास्क वापरत आहेत, अशा प्रकारच्या सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घ्यावयाच्या खबरदारीचे संदेश देणारे, हे चित्र अतिशय बोलके आहे.

शाळा बंद असल्या तरी सोशल नेटवर्किंग साईटसच्या माध्यमातून कळसुलकर शाळेचे शिक्षक मुलांच्या संपर्कात आहेत. घरच्या घरी मुले चित्रकलेसारखे वेगवेगळे छंद जोपासत आहेत. त्याचवेळी सध्याच्या परिस्थितीचे सामाजिक भान देखील हे विद्यार्थी स्वतः राखत असून आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला ही तसा संदेश देत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Panvel Express : नांदेड-पनवेल, हडपसर रेल्वेला आता तीन डबे वाढणार; प्रत्येक फेरीत २०४ प्रवाशांची अतिरिक्त सोय

Iran Hormuz Crisis: होर्मुझसाठी इराणच्या सात अटी; पूर्तता होईपर्यंत वाटाघाटी नाहीच, लष्करी कारवाईचाही पर्याय

Missing Person Complaints : बेपत्ताच्या तक्रारींवर आता थेट अपहरणाचा गुन्हा नवा नियम पोलिसांसाठी डोकेदुखी : अल्पवयीन प्रकरणी चार महिन्यांची मुदत

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Asian Games Shooting : आता विश्वकरंडकात पदक जिंकण्याचे ध्येय ; कोल्हापूरची मराठमाेळी नेमबाज सोनम मस्करचा विश्वास

SCROLL FOR NEXT