Metal craft Biography of Shri Swami Samarth in 6 acres of land in Talawade village sadvli 
कोकण

कोकणात धातू शिल्पातून साकारणार श्री स्वामी समर्थांचे जीवन चरीञ

प्रमोद हर्डीकर

साडवली  (रत्नागिरी) :  देवरुख जवळील तळवडे गावी ६ एकर जागेत श्री स्वामी समर्थांचे जीवनचरीञ आपण धातू शिल्पातून साकारणार आहोत अशी माहीती सुप्रसिद्घ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी सकाळला दिली.माझे गुरु आनंदस्वामी पेठे उर्फ पेठेकाका यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार,दृष्टांतानुसार मी व माझी पत्नी राधिका रामपुरे अशा दोघांनी हा प्रकल्प सर्वांच्या सहकार्याने पुर्णत्वास नेणार आहोत असे रामपुरे म्हणाले.


स्वामी समर्थांचे कर्दळीवनातुन झालेले आगमन ते त्यांच्या समाधीपर्यंतचा प्रवास धातू शिल्पातून उभारला जाणार आहे.यासाठी नामवंत शिल्पकारही सहभागी होणार आहेत.भगवान रामपुरे यांचे सुपुञ सागर रामपुरे हेही चांगले शिल्पकार आहेत.तळवडे येथे होणारा हा धातू शिल्प प्रकल्प स्वामी भक्तांना व पर्यटकांना पर्वणी ठरणार आहे.टिकलेश्वर मंदिराच्या पायथ्याजवळ हा प्रकल्प होणार आहे.याच ठिकाणी दत्तगुरुंचा दरबारही वसवण्यात येणार आहे.ञिमुर्ती दत्त,व दत्तगुरुंचे अंशावतार असा हा दरबार असणार आहे.


शिल्पकार भगवान रामपुरे यांनी या आधी मुंबई दलाल स्र्टिट शेअर बाजारचा बिगबुल शिल्प साकारले आहे.सोलापुर येथील राणी लक्ष्मीबाई व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे रामपुरे यांनी घडवली आहेत.विजय तेंडुलकर,श्रीराम लागु,आमिरखान,गीतकार गुलजार,शशीकपुर,मोहन आगाशे अशा अनेक दिग्गजांची शिल्पे रामपुरे यांनी घडवली आहेत.अनेक पुरस्कांरांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
सोलापुर येथुन भगवान रामपुरे व सौ.राधिका रामपुरे देवरुखला स्थायिक झाले आहेत.तळवडे येथील श्री स्वामी समर्थ जीवन चरीञ प्रकल्प सर्वांच्या सहकार्यातुन साकार होणार आहे ,आमचे दोघांचे चार हात फक्त यासाठी लागणार आहेत,बाकी सर्व स्वामी घडवुन आणणार आहेत असे भगवान रामपुरे यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा निर्णय! स्वस्त धान्य दुकानांत मिळणार रॉकेल; इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीने हाेणार वितरण..

Chhatrapati Sambhajinagar News: २०४ वर्षांची परंपरा जपणारी माळीवाड्यातील ‘काटेरी फास’ यात्रा; श्रद्धेचा थरार अनुभव

Datta Meghe Passes Away : विदर्भाचा बुलंद आवाज हरपला ! माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Guru Krupa importance: गुरुकृपा, श्रद्धेमुळे आध्यात्मिक प्रवास सुलभ; साधना करत अहंकार कमी करण्याचा श्री एम यांचा सल्ला!

आरोग्य विभागाचा निर्णय! राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना; नगरसेवक होणार जनआरोग्य समितीचे अध्यक्ष, वाचा...

SCROLL FOR NEXT