कोकण

हवामान विभागाचा इशारा; सिंधुदुर्ग किनाऱ्यावर 'या' तीन दिवसात मुसळधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

देवगड (सिंधुदुर्ग): सिंधुदुर्ग किनारपट्टीवर (Sindhudurg coast) धडकणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर येथील किनारपट्टीचे वातावरण बदलू लागले आहे. आज पहाटेच्या सुमारास हलका पाऊस झाला तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. वाराही सुटला असून वादळाचे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान, वादळाच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक(fishermen)मासेमारीसाठी जाताना आवश्‍यक काळजी घ्यावी किंवा मच्छीमारीसाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.

Meteorological hintcyclone Tokte Sindhudurg in three days kokan update

सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात वादळाचा तडाखा जाणवण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून किनारपट्टी भागात सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून (ता.१४) रविवारपर्यंत (ता.१६) किनारपट्टी भागात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. याची लक्षणे आजपासूनच किनारपट्टीवर काही प्रमाणात जाणवू लागली आहेत. आज पहाटे किनारपट्टी भागात तुरळक पाऊस झाला. दिवसभर वातावरण ढगाळ बनले होते. वाऱ्याचा वेग वाढण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा- सावधान! चार दिवसात कोकण किनारपट्टीवर ‘तोक्ते’ चक्रीवादळ धडकणार

‘‘अरबी समुद्रात उद्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्याची तीव्रता वाढून (ता. १६) ला चक्रीवादळ तयार होईल. याचा प्रभाव गोवा आणि महाराष्ट्रावर दिसेल. या भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे दिसतील. या दिवसात अरबी समुद्र प्रचंड खवळलेला असेल.’’

- शुभांगी भुते, हवामान विभाग अधिकारी, मुंबई वेधशाळा

जिल्ह्यावर काय होणार परिणाम?

जिल्ह्यात उद्या (ता. १४) ते 18 मे या कालावधीदरम्यान तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वादळ व मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाच्या तर १७ व १८ ला बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे, असा इशारा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रा (मुंबई) कडून देण्यात आला आहे.

काय घ्याल काळजी?

या वादळामुळे वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे घर किंवा वस्ती जवळील धोकादायक झाडे किंवा फांद्या असतील त्या त्वरित तोडून घ्याव्यात. ता. १४ ते १७ दरम्यान सर्वांनी सुरक्षित ठिकाणी राहावे.

Meteorological hintcyclone Tokte Sindhudurg in three days kokan update

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT