Milind Vaidya breaks world record with various experiments in agriculture 
कोकण

शेतीत वैविध्यपूर्ण प्रयोगाने मिलिंद वैद्य यांची जागतिक विक्रमाला गवसणी 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - तालुक्‍यातील रिळचे शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांना राज्य शासनाचा 2018 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला. गेल्या काही वर्षात शेती क्षेत्रात त्यांनी वैविध्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्यस्तरीय भातपिक स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला होता. 

मिलिंद वैद्य यांनी प्रामुख्याने भातशेतीत संशोधन करून चांगले उत्पादन घेतले आहे. दरवर्षी अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करून संतुलित पद्धतीने सेंद्रीय आणि रासायनिक खतांचा वापर करून पिक व्यवस्थापनावर त्यांनी भर दिला होता. कोकणातील शेतकाऱ्यांना चांगल्या दर्जाचे भातपीक उपलब्ध व्हावे, यासाठी ते प्रयत्न करत आले आहेत.

रत्नागिरीतील भात संशोधन केंद्राने तयार केलेल्या रत्नागिरी 8 या भात बियाण्याची निर्मिती करुन ते पुन्हा केंद्राला दिले आहे. सुमारे 1300 किलो बियाण्याचे उत्पादन घेतले आहे. 2018 साली त्यांनी गुंठ्याला 192 किलो भाताचे उत्पादन घेतले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्याना राज्यशासनाचा राज्यस्तरीय शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला. 

ऑक्‍टोबर महिन्यात कोथिंबीर, मुळा, पालक, काकडी, स्वीटकॉर्न, सुर्यफूल, शेंगदाणा यासारखी लागवड ते करतात. त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना विविध जिल्ह्यातून आमंत्रित केले जाते. 

जागतिक विक्रमाच्या जवळ.. 
खरीप हंगामात सगुणा पद्धतीने लागवड करून भाताचे विक्रमी उत्पादन घेत, जागतिक विक्रमाच्या जवळ पोहचण्याची मजल मारली. भाताचे हेक्‍टरी 19.24 टन इतके विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले. भात उत्पादनामध्ये चीनमधील शेतकऱ्याची 19.40 टन हेक्‍टरी इतक्‍या विक्रमाची नोंद आहे. वैद्य यांनी 2016 या विक्रमाशी बरोबरी करणारे उत्पादन आपल्या शेतामध्ये घेऊन दाखवले आहे. 

प्रामाणिकपणे मेहनतीने शेतात काम केले तर त्याचे फळ निश्‍चित मिळते. अनुभव हीच मोठी शिदोरी असून त्या आधारे शेती केल्यास फायदा होतो. 
- मिलिंद वैद्य, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT