mini lockdown effects on ratnagiri market daily 8 crore business stop
mini lockdown effects on ratnagiri market daily 8 crore business stop 
कोकण

लग्नसराई, पाडव्याच्या खरेदीला लॉकडाउनचा फटका; रत्नागिरीत दिवसभरातील 8 कोटींंची उलाढाल ठप्प

राजेश कळंबटे

रत्नागिरी : शासनाने मिनी लॉकडाउन केले आणि रत्नागिरीतील बाजारपेठ पूर्णतः ठप्प झाली. मेडिकल, किराणा, फळे-भाजी विक्रेते वगळता अन्य सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे रोजची सुमारे आठ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यात मोठा फटका सराफी पेढ्यांना बसला आहे. ऐन लग्नसराईत सराफींसह कपडे दुकाने बंद झाल्यामुळे त्यात भर पडली आहे. दुकानांमध्ये काम करणाऱ्यांचाही रोजगाराला ब्रेक लागला आहे.

शासनाने कडक निर्बंध लागू केले. यामध्ये जीवनावश्‍यक वस्तू वगळता, बाजारपेठेतील अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. यावर व्यापारी संतापले असून दरदिवशी विविध प्रकारची आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील छोट्या-छोट्या बाजारपेठांमध्ये कपडे, ज्वेलरी, चप्पल, मोबाईल यांसह अन्य प्रकारची सुमारे दीड हजार दुकाने आहेत.

शासनाच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाली असून रोजचे व्यवहारही थांबले आहेत. मंगळवारी (ता. ६) दुपारनंतर अंमलबजावणी झाली. गेले दोन दिवस उलाढाल थांबली आहे. याचा सर्वाधिक फटका कपडे आणि सराफी दुकानांना बसला आहे. लग्नसराई आणि सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहक सोन्यासह विविध साहित्य खरेदीकडे वळलेले आहेत. याचवेळी दुकाने बंद झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे.

गुढीपाडव्याला सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी झुंबड उडते. १३ एप्रिलला पाडवा असल्याने त्या दिवशीच्या मुहूर्तावर दागिने आणले जातात. ऐनवेळी बाजार बंद पडल्याचा मोठा फटका बसू शकतो. विवाह सोहळ्यांना परवानगी असली तरीही त्यासाठी आवश्‍यक वस्तूंची खरेदी कुठे करायची? हा प्रश्‍नच आहे. याकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे.

‘दुकाने उघडायला परवानगी द्या’

प्रशासनाने रस्त्यावर उतरू नका, असे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने सर्व व्यापारी सनदशीर मार्गाने आंदोलन करतील. मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांना एसएमएसद्वारे ‘दुकाने उघडायला परवानगी द्या’, असे मेसेज करणारे आंदोलन करणार असल्याची माहिती रत्नागिरी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई यांनी दिली.

एक नजर..

  • रत्नागिरी शहरासह परिसरात छोट्या-छोट्या बाजारपेठा 
  • कपडे, ज्वेलरी, चप्पल, मोबाईल आदी दुकाने  
  • विविध प्रकारच्या सुमारे दीड हजार दुकानांचा समावेश 
  • शासनाच्या निर्णयामुळे दुकाने बंद, व्यवहारही थांबले 
  • दुकानांतील कामावर अवलंबून असणाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा

प्रश्‍न

  • १३ एप्रिलला गुढी पाडवा; खरेदी कोठे करायचा हा प्रश्‍न
  • गेले दोन दिवस उलाढाल थांबली; व्यावसायिकांना फटका
     

"दुकाने अचानक बंद केल्यामुळे गुढीपाडव्याच्या विक्रीची सराफींची तयारी अर्धवट राहिली आहे. दर कमी असल्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. या परिस्थितीत झालेले लॉकडाउन सराफींना अडचणीचे आहे."
 

- प्रमोद खेडेकर, सराफी व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT