Mini Mahabaleshwar Dapoli esakal
कोकण

Dapoli Weather Update : मिनी महाबळेश्वरात कडाक्याची थंडी; दापोली शहर परिसर गारठला, पारा 9.4 अंशांवर

दापोली शहर परिसर अर्थात ‘मिनी महाबळेश्वर’ (Mini Mahabaleshwar) येथे कडाक्याची थंडी पडली आहे.

राधेश लिंगायत

यापूर्वी १९९९ मध्ये सर्वाधिक नीचांकी तापमानाची (३.४ अंश सेल्सिअस) नोंदही दापोलीत झाली आहे.

हर्णै : दापोली शहर परिसर अर्थात ‘मिनी महाबळेश्वर’ (Mini Mahabaleshwar) येथे कडाक्याची थंडी पडली आहे. आज (ता. १६) तापमानाची सर्वात कमी म्हणजेच ९.४ अंश सेल्सिअस नोंद झाली. भारतीय हवामान खात्यातर्फे (Indian Meteorological Department) देशात सलग तीन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचा प्रत्यय दापोलीमध्ये येत आहे.

यापूर्वी १९९९ मध्ये सर्वाधिक नीचांकी तापमानाची (३.४ अंश सेल्सिअस) नोंदही दापोलीत झाली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University) कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर मंगळवारी (ता. १६) ही नोंद झाली आहे. सोमवारी (ता.१५) सकाळी ८ पासून मंगळवारी (ता.१६) सकाळी ८ वा. पर्यंत झालेल्या चोवीस तासांतील ही नोंद आहे. आठवड्यापूर्वी हे तापमान १५ अंशांवर आले होते.

बऱ्यापैकी सुरू झालेल्या थंडीमुळे उत्साही पर्यटक थंडीचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. गेल्या शनिवार रविवारी पर्यटकांनी मुरुड, पाळंदे आंजर्ले बीचवर गर्दी केली होती. दापोली शहर समुद्र सपाटीपासून २५० मीटर उंचीवर वसलेले वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. त्यामुळे हे कोकणातील मिनी महाबळेश्वर अशी याची ओळख आहे. एवढ्या उंचीवर असले तरी अवघ्या ७ ते ८ किमीवर समुद्र किनारा आहे. सध्या किनाऱ्यावरदेखील गेले दोन दिवसांपासून थंड वारे वाहत होते. त्यामुळे किनारपट्टीलादेखील थंड हवामान होते.

कोकण किनारपट्टी भागात डिसेंबरमध्ये हुलकावणी दिलेल्या थंडीने जानेवारीत मुक्काम करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये १३ जानेवारी २०२३ रोजी नीचांकी ९.२ अंश इतके तापमान नोंदले गेले होते. थंडीचा हंगाम सुरू होताच पक्ष्यांची गर्दी सुरू व्हायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किनाऱ्यावर सकाळ, संध्याकाळ सिगल पक्ष्यांचा मुक्काम असतो. थंडीच्या कालावधीमध्ये या पक्ष्यांना पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल परिसर यामुळे हे पक्षी दरवर्षी काही कालावधीसाठी स्थलांतरित होतात. पारा घसरल्याने या पक्ष्यांचा मुक्काम अजूनही वाढण्याची शक्यता आहे.

पारा घसरला

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आपल्याकडील पारा घसरत आहे. आजचा पारा हा सूर्योदयापूर्वीच घसरला आहे. त्यामुळेच थंडीच प्रमाण वाढलं आहे, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्राचे प्रमुख डॉ. विजय मोरे यांनी सांगितले.

यापूर्वीचे नीचांकी तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

  • ३ जानेवारी १९९९- ३.४

  • ९ फेब्रुवारी २०१९- ४.५

  • १५ फेब्रुवारी १९८५- ५.००

  • १९ फेब्रुवारी १९९६- ६.०

  • २३ जानेवारी १९९७- ७.०

गेल्या आठवड्यात अवेळी पडलेला पाऊस आंबा बागायतदारांची चिंता वाढवणारा होता, परंतु अशा प्रकारचे थंड वातावरण जर किमान १५ दिवस जरी राहिले तरीही आंबा, काजू बागायतदार सुखावतील.

-सागर मयेकर, हर्णै, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT