mining issue atul raorane press conference kankavli sindhudurg 
कोकण

मायनिंगमध्ये दीड हजार कोटींचा घोटाळा ः रावराणे

राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - कासार्डे परिसरातील सिलिका मायनिंग उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही वर्षांत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल या सिलिका माफियांनी बुडवला आहे. सध्याच्या परिस्थितीत सुमारे दीड हजार कोटीचा हा घोटाळा असून या वाळू माफियांना महसूलचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी आज केला. 

येथील शिवसेना कार्यालयात श्री. रावराणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, राजू राठोड आदी उपस्थित होते. रावराणे म्हणाले, कासार्डे परिसरात अवैधपणे सुरू असलेल्या सिलिका मायनिंग उत्खनन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येथील मायनिंग व्यावसायिकांना अवैध उत्खनन प्रकरणी महसूलने 3 कोटी 70 लाखाचा दंड ठोठावला आहे; मात्र महसूलचे अधिकारी दंड झालेल्या व्यक्तीला 25 टक्के दंड भरून न घेता अपील स्वीकारत आहेत. त्यामुळे सिलिका माफियांना महसूल अधिकारी पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होते. 

मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्र्यांना भेटणार 
ते म्हणाले, या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी. बनावट पास वापरून वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहोत. अवैध वाळू उत्खननामुळे येथील पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे सिलिका माफिया विरोधात कारवाई व्हायलाच हवी. त्याचबरोबर बनावट पास देणाऱ्या मायनिंग अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल व्हायला हवेत. सध्या दररोज 400-500 गाडयाचे बेकायदेशीर उत्खनन केले जात आहे. रात्रीच्या वेळेत वाळू वाहतूक होत आहे.  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore: ‘प्लॅन डी’ असता, तर चित्र वेगळे असते: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; त्यांना सदस्य संभाळता येत नाहीत!

Latest Marathi News Live Update : युद्धामुळे बंद झालेल्या केळी निर्यातीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत

Shivendraraje Bhosale: बहुमत नसल्याने बहिष्काराची भूमिका: बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, सीसीटीव्हीसाठी चौकशी करा

AI Chatbox As Referee : जेन-झीच्या प्रेमात डिजिटल ट्विस्ट; भांडणं मिटवण्यासाठी AI बनतोय ‘पंच’, पॅचअपसाठी वाढतोय तरुणांचा विश्वास

Thackeray group Kolhapur : कोल्हापुरात ठाकरे गट पुन्हा उभारी घेणार, मोठ्या नियोजनाच्या तयारीत

SCROLL FOR NEXT