कोकण

सिंधुदुर्ग आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे आरोग्य राज्यमंत्र्यांचे आश्वासन

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे. त्यासाठी लवकरच डॉक्‍टरसह अन्य रिक्त पदे भरण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज येथे दिली. कोरोना लढ्यामध्ये जिल्ह्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ आणि साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हा मुख्यालयात पाटील यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने चांगले काम केल्याचे सांगून ते म्हणाले, ""येथे मृत्यू दर कमी आहे, ही एक चांगली बाब आहे. रुग्ण संख्या कमी असणाऱ्या चार-पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गचा समावेश आहे, ही समाधानाची बाब आहे. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही लवकरच मार्गी लागेल. जिल्ह्याला लागणारी सर्व साधन सामग्री पुरवण्यात येईल. सध्या जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळाची कमतरता जाणवते आहे. ही कमतरता कमी करण्यासाठी लवकरच जिल्ह्यात डॉक्‍टर्ससह इतर रिक्त पदे भरण्यात येतील.'' 

या वेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील, कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, संदेश पारकर, संजय पडते आदी उपस्थित होते. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT