Minister Uday Samant Discussion with Chief Minister Uddhav Thackeray because Regarding lawyers in the state 
कोकण

साडेअठ्ठावीस हजार वकिल अडचणीत का ते वाचा...

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : कोरोनाच्या गंभीर समस्येमुळे महाराष्ट्रातील बहुतेक न्यायालये लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून बंद आहेत. न्यायालयाचे कामकाज बंद झाल्याने महाराष्ट्रातील पाच वर्षे ज्युनिअर असलेल्या 28 हजार 547 वकिलांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सहानुभूतीपूर्वक मार्ग काढू, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणंत्री उदय सामंत यांनी दिले.


राज्यातील वकिलांसंदर्भात रत्नागिरीतील ज्येष्ठ वकील अ‍ॅड. विलास पाटणे, अ‍ॅड. अशोक कदम व अ‍ॅड. विजय साखळकर यांनी मंत्री सामंत यांची आज रत्नागिरी दौर्‍याप्रसंगी भेट घेतली. त्या वेळी श्री. सामंत यांनी तत्काळ हा विषय मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करून सोडवू, अशी ग्वाही दिली.

ज्युनिअर वकिलांना आर्थिक मदत सहानुभूतीने करू
कर्नाटक राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील वकिलांना 5 कोटींचे आर्थिक साहाय्य केले आहे. महाराष्ट्रातील ज्युनिअर वकिलांची दुप्पटीने संख्या लक्षात घेऊन किमान दहा कोटी रुपये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रकडे दिल्यास ज्युनिअर वकील व क्लार्क यांना आर्थिक साहाय्य करणे सोयीचे होईल. राज्यात 1 लाख 12 हजार 706 वकिलांचे नेतृत्व बार कौन्सिल करत आहे.

त्यामुळे या संस्थेमार्फत मदत देणे सोपे होईल. त्याकरिता खासदार विनायक राऊत, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सदस्य अ‍ॅड. पारिजात पांडे, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. गजानन चव्हाण, अ‍ॅड. मिलिंद पाटील व अ‍ॅड. उदय वारुंजीकर प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती अ‍ॅड. विलास पाटणे यांनी दिली.

संपादन - अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT