mirya nagpur highway working and compailent from kolhapur office in ratnagiri 
कोकण

अनधिकृत बांधकामाचा विषय म्हणजे ‘आग रामेश्‍वरी आणि बंब सोमेश्‍वरी ; मिऱ्या-नागपूर मार्ग

राजेश शेळके

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर हायवेवर होणाऱ्या अनधिकृत बांधकामाचा विषय म्हणजे ‘आग रामेश्‍वरी आणि बंब सोमेश्‍वरी’, असाच बनला आहे. हा महामार्ग ४ मे २०२० ला नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे या महामार्गाशी येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचा काहीच संबंध नाही. नॅशनल हायवे ऑफ ॲथॉरिटीच्या कोल्हापूर कार्यालयाशी याचा संबंध आहे. त्यांच्याकडूनच महामार्गालगतच्या अनधिकृत बांधकांमांवर पुढील कारवाई होणार आहे. 

स्थानिक पातळीवर कोणालाही कारवाईचा अधिकार नसल्याने शहराजवळील साळवी स्टॉप ते टीआरपी परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गामध्ये रिकाम्या जागांवर अनधिकृत बांधकामांचे पेवच सुटले आहे. कोणीही येतो आणि रातोरात बांधकाम करीत सुटतो. साळवी स्टॉप येथे तर रस्त्याच्या बाजूला एका रांगेत पक्की अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. काहींनी बांधकाम करून ते गाळे भाड्याने दिल्याचीही चर्चा आहे.

जे. के. फाईलदरम्यान देखील अनेक वर्षांपासून कच्ची बांधकामे करून अनेक व्यवसाय सुरू ठेवले आहेत. काही भाग नाचणे ग्रामपंचायत विभागात येत असल्याने तेथेही पालिकेची कर पावती नावाला दिली जाते; मात्र अंतर्गत महिन्याचा भाड्याचा विषय वेगळाच आहे. अशा प्रकारे शासनाच्या जागेचा लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने बाजार मांडल्याचा प्रकार सुरू आहे. महामार्ग विभागाला याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी दिलेली माहिती धक्कादायकच आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या विभागाने मिऱ्या - नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी नॅशनल हायवे ऑफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित केला आहे. त्याचे कार्यालय कोल्हापुरात आहे. या मार्गावरील अनधिकृत बांधकामाबाबत हे कार्यालयच कारवाई करू शकते. आमचा याच्याशी काही संबंध नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आतापर्यंत अंधारातच भुई धोपटल्याचा प्रकार सुरू असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. 

बांधकामांशी आमचा संबंध नाही

नॅशनल हायवेच्या कोल्हापूर ऑफिसने यापूर्वी अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत. पुढील कारवाई तेच करतील, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी 
अभियंता सलीम शेख यांनी ‘सकाळ’ला दिली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT