गुन्हा
गुन्हा  
कोकण

आमदार बनसोडेंच्या मुलाला कोळंबेत अटक; हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

सकाऴ वृत्तसेवा

तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

पावस (रत्नागिरी) : पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (MLA anna bansode) यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे (siddharth bansode_ याला रत्नागिरी (ratnagiri) तालुक्‍यातील कोळंबे-लक्ष्मीनगर (kolambe laxminagar) येथून अटक (arrest) केली. पिंपरी-चिंचवड येथील पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केल्यानंतर पूर्णगड पोलिस ठाण्यात याबाबत माहिती देऊन संशयिताला पोलिस घेऊन गेले आहेत. मारहाण आणि हत्येचा प्रयत्न अशा आरोपात ते संशयित आहेत. पूर्णगड पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांनी याला दुजोरा दिला. (MLA anna bansode son siddharth bansode arrested from kolambe laxminagar in ratnagiri taluka)

तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने परस्पर विरोधात तक्रार दिली आहे. आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल केला.

तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिस सिद्धार्थ बनसोडेचा शोध घेत होते. पंधरा दिवस तो नजरेआड होता. पोलिस त्याच्या मागावर असताना तो रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे-लक्ष्मीनगर (पावस) येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सिद्धार्थ बनसोडे येथे एका मित्राकडे आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी येथे येऊन त्याला अटक केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे ११ मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला. लोखंडी टॉमीसारख्या शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून सिद्धार्थ आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आमदार बनसोडे यांच्या पीएलादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. (MLA anna Bansode son siddharth bansode arrested from kolambe laxminagar in ratnagiri taluka)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT