MLA Bhaskar Jadhav Angry On Officers Ratnagiri Marathi News 
कोकण

आमदार भास्कर जाधव का झाले संतप्त ?

सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी) - गुहागर विधानसभा मतदार संघात चक्रीवादळ झाल्यानंतर संबंधित अधिकारी नुकसानग्रस्त भागाकडे फिरकले नाही त्यामुळे आज मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेले आमदार भास्कर जाधव संतप्त झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना कडक भाषेत समज दिली.

त्यानंतर नुकसानग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्याचा शब्द आमदार जाधव यांनी दिला. त्याशिवाय वैयक्तिक मदत देण्याचेही जाहीर केले. 

गुहागर मतदारसंघातील चिपळूण व गुहागर तालुक्‍यातील काही गावांना मंगळवारी सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. मोठया प्रमाणात नुकसान होवूनही संबंधित वरिष्ठ अधिकारी या भागाकडे फिरकले नव्हते. अधिकाऱ्यांच्या आधीच सर्वाधिक नुकसान झालेल्या बोरगाव, बामणोली (ता. चिपळूण) आणि वेळंब (ता. गुहागर) व परिसरातील गावांमध्ये आमदार जाधव हे पोहोचले आणि त्यांनी नुकसानीची पाहणी केली.

वादळात अनेक घरे, गोठे यांची पडझड झाली आहे, आंबा- काजू, फणस, नारळ, कोकम या फळझाडांसह अनेक प्रकारची झाडे उन्मळून पडली आहेत. बागायतींचे नुकसान झाले आहे. महावितरणचे नुकसान झाले आहे. या आपत्तीनंतर आमदार जाधव यांनी त्याचदिवशी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. 

नुकसानग्रस्तांना वैयक्तिक मदत 

चक्रीवादळात अनेक घरांची छपरेच उडाल्याने या घरांमधील कुटुंबं उघड्यावर आली आहेत. आधीच कोरोनामुळे गेले महिनाभर लॉकडाऊन आहे. लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्याकडे पैसे नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेवून आमदार जाधव यांनी शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच नुकसानग्रस्तांना वैयक्तिक मदत देण्याचे यावेळी जाहीर केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

Diwali Railway Tickets : दिवाळीच्या रेल्वे तिकिटांना आतापासूनच प्रतीक्षा ; आरक्षण सुरू होताच पाच मिनिटांत ‘रिग्रेट’; लांब पल्ल्याच्या गाड्यांना मागणी

Pune Bridge Repairs : पुण्यातील २१ पुलांची दुरुस्ती आयुर्मान वाढण्यास मदत; दरवर्षी होणार नियमित तपासणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT