Muslim Community Nitesh Rane esakal
कोकण

Nitesh Rane : मुस्लिमांविरोधात नितेश राणेंचं 'ते' वक्तव्य अत्यंत भयंकर; राष्ट्रवादीच्या नेत्याकडून कारवाईची मागणी

आमदार नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात (Muslim Community) केलेले वक्तव्य गंभीर आणि भयंकर आहे.

सकाळ डिजिटल टीम

नीतेश राणे (Nitesh Rane) खुलेआम धमक्या देत असतील तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी; पण सरकारने कोणतीच दखल घेतलेली नाही.

चिपळूण : आमदार नीतेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात (Muslim Community) केलेले वक्तव्य गंभीर आणि भयंकर आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटातर्फे आम्ही नीतेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून, त्यांच्या पक्षाने व नेत्यांनी त्यांना समज देऊन रोखले पाहिजे तसेच सरकारनेदेखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

रमेश कदम म्हणाले, मुस्लिम समाज येथे आताच आलेला नाही. पिढ्यानपिढ्या हा समाज येथे शांततेत आणि एकोप्याने राहत आहे. हिंदूच्या सणामध्ये आनंदाने ते सामील होतात. त्यांच्या सणामध्ये आम्हीदेखील उत्साहाने सहभागी होतो. कोकणाला आणि महाराष्ट्राला तर हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा आहे.

नीतेश राणे (Nitesh Rane) खुलेआम धमक्या देत असतील तर सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला हवी; पण सरकारने कोणतीच दखल घेतलेली नाही. भाजप आणि सरकार त्यांना पाठीशी घालून अशा वक्तव्यांचे समर्थन तर करत नाहीना आमदार नीतेश राणेंना भाजपने वेळीच रोखावे. सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी.

....तर गीतेंना पाठिंबा

अनंत गीतेंच्या उमेदवारीबाबत छेडले असता रमेश कदम म्हणाले, राजकारणात काम करत असताना व्यक्ती मोठी नसते तर पक्ष मोठा असतो. त्यामुळे पक्षाने एखादा निर्णय घेतला तर कार्यकर्ता म्हणून त्याचे पालन हे केलेच पाहिजे. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. त्यामुळे आघाडीतर्फे जर लोकसभेची उमेदवारी अनंत गीतेंना मिळाली तर निश्चितपणे मी त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघात फिरेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT