MLA Nitesh Rane says suffering due to support to Nanar join BJP 
कोकण

समर्थनामुळे त्रास होत असल्यास भाजपमध्ये या: आमदार नितेश राणे

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी  स्थानिकांनी मागणी केल्यास नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील असे मत मांडणारे आमदार राजन साळवी याना भाजपमध्ये येण्याचे आवताणच आमदार नितेश राणे यांनी दिले.

ते म्हणाले,राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतल्यामुळे जर त्यांना शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे. 

आमदार राजन साळवी यांनी एका वृत्तवाहिनीशी सूचक वक्तव्य केले होते.यामुळे राज्यातील आणि कोकणातील वातावरण पुन्हा एकदा रिफायनरी प्रश्नावरून ढवळून निघाले. यावर खासदाकर विनायक राऊत यांनी साळवी यांचे ते व्यक्तिगत मत असल्याचे सांगितले. साळवी यांच्या या विधानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र एवढे महत्वाच्या विषयावर श्रेष्ठींच्या संमत्तीविना साळवी बोलतीलका असा प्रश्‍न केला जात आहे.

या विषयात बोलताना आमदार नितेश राणे यांनी आमदार राजन साळवी यांना भाजपत येण्याची ऑफर दिली आहे. प्रतिक्रिया देताना आमदार नितेश राणे म्हणाले की, राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनार्थ भूमिका घेतल्यामुळे जर त्यांना शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे.

भाजपमध्ये नाणारचे समर्थक आमदार म्हणून त्यांचे स्वागत होईल. आम्ही लोकांच्या बाजूने आहोत, लोकांच्या मताला किंमत देतो. मी जशी समर्थनार्थ भूमिका घेतली तशी राजन साळवी यांनी घेतली आहे. जर त्यांना या भूमिकेमुळे शिवसेनेत त्रास होत असेल तर भाजपाचे दरवाजे उघडे आहेत.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''कॅमेऱ्याचा एँगल नाही, हृदयाचा एँगल बदला'', भर सभागृहात प्रियंका गांधींकडून मोदींवर बोचरी टीका; नेमकं काय म्हणाल्या?

Mumbai Crime: MIDC पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरीत्या मुंबईत राहणारे ७ बांगलादेशी तृतीयपंथी जेरबंद; सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश

Kasari Green Revolution: कासारी गावातील ओसाड गायरानात १००० रोपांची लागवड; ५००० झाडांचे लक्ष्य, ठिबक सिंचनासह हरित क्रांतीचा संकल्प

Mumbai News: रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला, उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान विचित्र प्रकार; नेमकं काय घडलं?

Chitrakoot Crime News: NEET विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चित्रकूटमध्ये ३७४ CCTV, ६ हजार कॉल्स तपासले, मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

SCROLL FOR NEXT